Ads

Tuesday, June 15, 2021

IND v NZ WTC FINAL Live Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल भारत वि. न्यूझीलंड फायनल लाइव्ह आणि स्ट्रीमिंग

नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलसाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघातील ही लढत १८ जून पासून साउदम्प्टनच्या द रोझ बाउल मैदानावर होणार आहे. वाचा- WTCची फायनल प्रथम क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार होती. पण नंतर त्याचे ठिकाण करोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन साउदम्प्टन करण्यात आले. वाचा- फायनल मॅचच्या तयारीसाठी न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे. या मालिकेत त्यांनी १-०ने विजय मिळवला. तर भारतीय संघाने देखील दोन गट तयार करून तीन दिवसांचा सराव सामना खेळला. वाचा- -भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील WTC फायनल कधी होणार आहे? >> भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल १८ ते २२ जून या काळात होणार आहे. -भारत आणि न्यूझीलंड World Test Championship Final कोणत्या मैदनावर होणार आहे? >> भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील WTC फायनल साउदम्प्टनच्या रोझ बाऊल मैदानावर होणार आहे. -भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलचा टॉस किती वाजता होणार? >> WTC फायनलचा टॉस भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होईल. -भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील WTC फायनल किती वाजता सुरू होईल? >> भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल. -भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील WTC फायनलचे लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? >> भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील WTC फायनलचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स १ हिंदी वर पाहू शकता. या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स आणि स्कोअरकार्ड maharashtratimes.com वर पाहू शकता. -भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील WTC फायनलचे लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइनवर कुठे पाहता येईल. >> WTC फायनलचे लाइव्ह स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर पाहता येईल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला इतिहास घडवण्याची संधी आहे. जर भारताने ही लढत जिंकली तर विराटच्या नेतृत्वाखाली भारत प्रथमच आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद स्वत:च्या नावावर करेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wvdQ1A

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...