साउदम्प्टन: भारताविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी न्यूजीलंडने १५ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ १८ जून ते २२ जून या काळात साउदम्प्टन येथे ऐतिहासिक फायनल मॅच खेळणार आहे. न्यूझीलंडने फायनल सामन्याआधी इंग्लंडविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. या विजयामुळे न्यूझीलंडचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. वाचा- WTC फायनलसाठी फक्त तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे आणि न्यूझीलंड संघाने १५ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. या संघात टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, एजाज पटेल यांचा समावेश आहे. एजाज पटेल या एकमेव फिरकीपटूचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आलाय. वाचा- न्यूझीलंडने कॉलिन डी ग्रँडहोमचा ऑलराउंडर तर विल यंगचा फलंदाज म्हणून संघात समावेश केलाय. त्यांनी टॉम ब्लंडेलचा बॅकअप विकेटकीपर म्हणून समावेश केलाय. डग ब्रेसवेल, जॅकब डीफ, डेरिल मिशेल, रचिन रविंद्र आणि मिशेल सेंटनर असे पाच खेळाडू आहेत जे इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत संघात होते. पण त्यांना फायनल मॅचमध्ये स्थान देण्यात आले नाही. वाचा- कर्णधार केन विलियमसनला दुसऱ्या कसोटीच्या आधी दुखापत झाली होती. पण ही दुखापत अधिक गंभीर नाही. त्यामुळे भारताविरुद्धच्या फायनलमध्ये तोच नेतृत्व करले. असा आहे न्यूझीलंडचा संघ केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डोवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोमे, मॅट हेन्नरी, काइल जॅमीसन, टॉम लँथम, हेन्नरी निकोल्स, एजाज पटेल, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ऐतिहासिक फायनल मॅच जिंकणाऱ्या विजेत्या संघाला आयसीसीकडून ११.७१ कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला ५.८ कोटी रुपये मिळणार आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gougmE
No comments:
Post a Comment