मुंबई: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर दाखल झाला आहे. इंग्लंडमध्ये गुरुवारी पोहोचलेल्या भारतीय खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. भारताची १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. तीन दिवसांच्या क्वारंटाइननंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात पाऊल ठेवले. वाचा- WTC फायनलच्या आधी भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे प्रमुख यांनी संघातील दोन खेळाडूंना मोठा फटाक बसू शकतो असे म्हटले आहे. भारताचा कर्णधार आणि यांना फायनलच्या आधी सरावाच्या कमतरतेचा फटका बसू शकतो असे मत वेंगसरकर यांनी व्यक्त केले. वाचा- भारताकडून ११६ कसोटी सामने खेळणाऱ्या अनुभवी विराट आणि रोहित हे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण सरावाचा आभाव याचा फटका त्यांना फायनल सामन्यात बसू शकतो. मोठ्या कालावधीपासून विराट जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट किंवा रोहित असे खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या कामिगरीचा गर्व आहे. भारताच्या विजयात त्यांचे मोठे योगदान असते. वाचा- सध्या दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. पण सरावाची कमतरता ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते, असे वेंगसरकर म्हणाले. फायनल मॅचच्या आधी न्यूझीलंडला थोडा फायदा होऊ शकतो. कारण ते इंग्लंडच्या भूमीवर त्याच्याच विरुद्ध खेळणार आहेत. वाचा- चेंडू
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2S5LH2d
No comments:
Post a Comment