मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल येत्या १८ जून रोजी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ किती जलद गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजांना संधी देते हे पाहावे लागणार आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू , आणि आकाश चोप्रा यांनी सध्याच्या क्रिकेटमधील पाच सर्वोत्तम गोलंदाजांची निवड केली आहे. या यादीत चॅपल यानी पॅट कमिंन्स, कगिसो रबाडा, आणि इशांत शर्मा यांचा समावेश केला आहे. वाचा- चॅपल यांनी तयार केलेल्या या यादीतील आर अश्विनच्या समावेशाबद्दल संजय मांजरेक यांनी हरकत घेतली आहे. मांजरेकरांच्या मते अश्विनने भारताकडून ७८ कसोटीत ४०९ विकेट घेतल्या आहेत. त्याने ३० पेक्षा जास्त वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. जेव्हा लोक अश्विनला सर्वकालीन महान गोलंदाज म्हणतात तेव्हा मला ते पटत नाही. अश्विनने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध एकदाही पाच घेतल्या नाहीत. वाचा- अश्विनने ४०९ पैकी २८६ विकेट भारतात घेतल्या आहेत. यात २४ पेक्षा अधिक वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. जेव्हा भारतीय विकेटवर आपण त्याची कामगिरी दमदार आहे असे म्हणतो तेव्हा हे देखील लक्षात घेतले पाहिजे की चार वर्षात रविंद्र जडेजाने अश्विन इतक्या विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत अक्षर पटेलने अश्विन पेक्षा अधिक विकेट घेतल्या होत्या. यामुळे अश्विनला सर्वकालीन महान गोलंदाज म्हणणे चुकीचे ठरले. वाचा- नाथन लियोन पेक्षा अश्विन चांगला चॅपल यांनी भारताचा अश्विन हा नाथन लियोनपेक्षा चांगला गोलंदाज असल्याचे सांगितले. लियोनचा स्ट्रइक रेट पाहा तुम्ही ७०च्या दशकाबाबत बोलत आहात आणि मी २०१८ सालाबद्दल बोलत आहे. २०१८ पासून लियोनने २७ कसोटीत ७२.५च्या सरासरीने ११३ विकेट घेतल्या आहेत. त्याने सहा वेळा पाच किंवा त्यापेक्षा विकेट घेतल्या. या काळात भारताविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट ८५.५ इतका आहे. जो अन्य सर्व संघांपेक्षा सर्वात खराब आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RreeyD
No comments:
Post a Comment