लंडन: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडने आघाडी घेतली असली तरी त्यांच्यासाठी एक काळजीची विजय आहे आणि तो म्हणजे कर्णधार यांची इंग्लंडमधील खराब कामगिरी होय. वाचा- पहिल्या डावात केनने १३ धावा केल्या तर दुसऱ्या डावात फक्त एक धाव करून तो बाद झाला. पहिल्या डावात न्यूझीलंडने १०३ धावांची भागिदारी केली आणि त्यानंतर दुसऱ्या डावात १६९ धावांवर त्यांनी डाव घोषीत केला. आज सामन्याचा पाचवा दिवस असून कसोटी ड्रॉ होणार यात काही शंका नाही. वाचा- न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यानंतर भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळाची आहे. इंग्लंडमध्ये गेल्या १० डावात न्यूझीलंडचा कर्णधार केनची सरासरी २६ इतकी आहे. इंग्लंडमधील गेल्या ५ सामन्यात त्याने २६१ धावा केल्या आहेत. ज्यात १३२ धावा एका डावात केल्या आहेत. याचा अर्थ ही एक खेळी जर बाजूला केली तर त्याची इंग्लंडमधील कामगिरी खराब झाली आहे. वाचा- ... केनची ही कामगिरी इतकी खराब आहे की भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारची इंग्लंडमधील गेल्या पाच डावातील सरासरी २७ इतकी असून त्याने नाबाद ६३ धावांसह २४७ धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vWEqQP
No comments:
Post a Comment