मुंबई: भारतीय संघातील खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबईत जोरदार तयारी करत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार याने काही दिवासंपूर्वी सोशल मीडियावर चाहत्याच्या एका प्रश्नाचे उत्तर दिले होते. त्यावरून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. यावर आता विराटने स्पष्टीकरण दिले आहे. वाचा- काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने इंस्टाग्रामवर चाहत्याने प्रश्न विचारण्याचे आवाहन केले होते. त्यावर एका चाहत्याने विराटला त्याच्या डायट संदर्भात प्रश्न विचारला होता. खुप साऱ्या भाज्या, काही अंडे, दोन कप कॉफी, किन्नू आणि खुप सारे पालक. मला डोसा देखील आवडतो. पण सर्व काही मर्यादित असते. वाचा- विराटच्या या उत्तरावर अनेकांनी त्याच्या डायटचे कौतुक केले. पण काही लोकांना त्याच्या डायटमध्ये अंडे असल्याचे वाचून आश्चर्य वाटले. कारण विराटने त्याच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये व्हीगन (जे लोग आहारात मास आणि डेअरी उत्पादनाचे सेवन करत नाहीत) असल्याचा उल्लेख केला होता. वाचा- सोशल मीडियावर यावरून सुरू झालाला वाद वाढत असल्याचे पाहून विराटने मंगळवारी एक ट्विट केले. मी कधीच व्हीगन असल्याचा दावा केला नाही. मी नेहमीच म्हटले आहे की मी शाहाकारी आहे. दिर्घ श्वास घ्या आणि शाहाकार घा (जर तुमची इच्छा असेल तर) वाचा- काय म्हणाला होता विराट तेव्हा मला स्पाइनचा त्रास होत होता. त्यामुळे मला बॅट पकडण्यास येत नव्हती. २०१८च्या सेंच्युरिअन टेस्टमध्ये असे घडले होते. माझ्या पोटात अॅसिड तयार होत होते आणि त्यामुळे मला स्पाइनचा त्रास सुरू झाला. यामुळे मला मांसाहार सोडावा लागला आता मला छान वाटते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pd0TXo
No comments:
Post a Comment