नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. बाबर आणि भारताचा कर्णधार विराट कोहली याची नेहमी तुलना होते. अनेक बाबतीत बाबरने विराटला मागे टाकले आहे. आयसीसी क्रमवारीत देखील तो अव्वल स्थानी आहे. अशात बाबर आणखी एका निमित्ताने चर्चेत आला आहे. वाचा- बाबर आझम लवकरच विवाह करणार आहे. बाबर त्याच्या चुलत बहीणीशी विवाह करणार असल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे. बाबर सध्या PSLच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अबुधाबीत आहे. अशात तो पुढील वर्षी चुलत बहीणीशी विवाह करणार असल्याचे वृत्त समोर आले. वाचा- पीएसएलमध्ये बाबर कराची किंग्जकडून खेळतो. या स्पर्धेतील २० लढती ९ जून पासून सुरू होणार आहे. बाबरचा साखरपुडा झाला आहे. ही बातमी त्याला गुप्त ठेवायची होती. पण ती बाहेर आली. पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंना बाबरचा साखरपुडा झाला ही गोष्ट माहिती होती, असे जिओ न्यूजने म्हटले आहे. वाचा- शोषणाचा आरोप बाबर आझमवर हमिजा मुख्तार नावाच्या महिलेने शोषणाचा आरोप केला आहे. संबंधित महिलेने तिचे शोषण झाले, सक्तीने गर्भपात केल्याचा आणि लग्नाचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोप बाबरवर केला होता. वाचा- २६ वर्षीय बाबरचा समावेश पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजांमध्ये केला जात आहे. त्याने आतापर्यंत ३३ कसोटी, ८० वनडे आणि ५४ टी-२० सामने खेळले आहेत. त्याची कसोटीतील सरासरी ४३च्या जवळ आहे. वनडेत ५६ तर टी-२०त ४८च्या सरासरीने त्याने धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34D86Xg
No comments:
Post a Comment