दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील उर्वरित ३१ लढती कधी सुरू होणार याची उत्सुकता सर्वांना आहे. २९ मे रोजी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. या संदर्भात काल ३१ मे रोजी युएईमधील या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात आढावा घेण्यात आला. वाचा- करोना व्हायरसमुळे ९ एप्रिल रोजी सुरू झालेला आयपीएलचा १४वा हंगाम २९ लढतीनंतर ४ मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. बायो बबलमध्ये असलेल्या खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेतला गेला होता. त्यानंतर स्पर्धेतील शिल्लक ३१ लढती कुठे आणि कधी खेळवल्या जातील याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. यात इंग्लंड आणि श्रीलंकेचा देखील समावेश होता अखेर युएईवर शिक्कामोर्तब करण्यात आले. वाचा- याआधी समोर आलेल्या वृत्तानुसार १९ किंवा २० सप्टेंबर रोजी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल आणि फायनल मॅच १० ऑक्टोबर रोजी होईल. आता आयपीएलचा दुसऱ्या टप्पा १९ किंवा २० नव्हे तर १७ सप्टेंबर रोजी सुरू होण्यावर सहमती झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि अखेरची कसोटी १० ते १४ सप्टेंबर या काळात होणार आहे. या नंतर भारतीय खेळाडू तातडीने दुबईला येतील. वाचा- या संदर्भात चर्चा करण्यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शहा, खजिनदार अरुण सिंह धुमल, उपाध्यक्ष राजीव शुक्ल दुबईत आहेत. ते युएई सरकार आणि क्रिकेट बोर्डासोबत चर्चा करणार आहेत. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युएई बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की, सामन्या दरम्यान स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहता येईल. ज्यांनी करोनाची लस घेतली आहे फक्त त्यांनाच मैदानात प्रवेश दिला जाईल. युएईमधील दुबई, अबूधाबी आणि शाहजाहमध्ये आयपीएलच्या लढती होणार आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uFiKXK
No comments:
Post a Comment