लंडन: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी मालिकेतील पहिली लढत लॉर्ड्स मैदानावर झाली. पावसामुळे ही लढत ड्रॉ झाली. न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी २७३ धावांचे लक्ष्य दिले होते. पण पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडला ३ बाद १७० धावा करता आल्या. या सामन्यात काही मजेदार घटना घडल्या. वाचा- सामन्याच्या अखेरच्या दिवशी मैदानात उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने खेळाडू आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दुसऱ्या डावात न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना एका प्रेक्षकाने अशी काही कृती केली की सर्वजण हसू लागले. वाचा- संबंधित क्रिकेट चाहता पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट घालण्याचा प्रयत्न करत होता. बराच वेळ घेतल्यानतंर त्याने रेनकोट घातला पण तो उटला घातला गेला. रेनकोट निट करण्याचा त्याचा प्रयत्न कॅमेरामॅनने टिपण्याची संधी सोडली नाही. वाचा- हा प्रकार मैदानावर असलेल्या मोठ्या पडद्यावर देखील दाखवला जात होता. त्यामुळे अन्य प्रेक्षक आणि खेळाडूंचे लक्ष देखील त्याच्याकडे गेले. रेनकोट चुकीच्या पद्धतीने घातल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तो काढला आणि दुसऱ्या प्रयत्नात तो व्यवस्थीतपणे घातला. रेनकोट निट घातल्यानंतर खेळाडू आणि अन्य प्रेक्षकांनी त्याचे अभिनंदन देखील केले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iqctwN
No comments:
Post a Comment