नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये असे काही फलंदाज आहेत जे पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांची धुलाई करतात. अशा स्फोटक फलंदाजांपासून प्रतिस्पर्धी संघ नेहमी सावध असतो आणि त्यांना लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करतो. वाचा- क्रिकेटमध्ये वनडे फॉर्मेटनंतर आता टी-२० लोकप्रिय झाले आहे. टी-२० मध्ये एखाद्या खेळाडूंने शतक झळकावले तर मोठी गोष्ट ठरते. पण आता टी-२० पाठोपाठ टी-१० स्पर्धा सुरू झाल्या आहेत. टी-२० पेक्षा वेगाने खेळल्या जाणाऱ्या या क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने फक्त २८ चेंडूत शतक झळकावले आहे. वाचा- युरोपियन क्रिकेट सीरीज टी-१० लीगमध्ये कुमेरफेल्डर स्पोर्टवेरिनकडून खेळताना या पाकिस्तानच्या फलंदाजाने ३३ चेंडूत ११५ धााव केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १३ षटकार मारले. अहमदच्या या वादळी खेळीमुळे कुमेरफेल्डर संघाने १० षटकात १९८ धावांचा डोंगर उभा केला. उत्तरा दाखल THCC हॅम्बर्ग संघाला फक्त ५३ धावा करता आल्या आणि स्पोर्टवेरिनने १४५ धावांनी हा सामना जिंकला. वाचा- मुसद्दीक अहमदने युरोपियन क्रिकेट सीरीज टी-१० मध्ये सर्वात वेगाने शतक झळकावले. याआधी हा विक्रम इंडियन क्रिकेट क्लबचा फलंदाज गोहार मनन याच्या नावावर होता. मनन ने २९ चेंडूत शतक झळकावले होते. अहमदने आतापर्यंत ३१ प्रथम श्रेणी आणि ४१ लिस्ट ए सामने खेळले आहेत. त्या शिवाय २५ टी-२० सामन्यात १५७च्या स्ट्राइक रेटने २९० धावा केल्या आहेत. वाचा- ..
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xazpV5
No comments:
Post a Comment