नवी दिल्ली: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील महिन्यात जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी निवड करण्यात आलेल्या २० खेळाडूंना मुंबईत १४ ते २८ जून या काळात क्वारंटाइन रहावा लागणार आहे. वाचा- श्रीलंकेविरुद्धची मालिका १३ जुलैपासून सुरू होणार आहे. प्रत्येकी ३ सामन्यांची वनडे आणि टी-२०ची मालिकेसाठी श्रीलंकेत पोहोचण्याच्या आधी भारतीय संघातील सर्व खेळाडूंची सहा वेळा आरटी-पीसीआर टेस्ट केली जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि पाच सामन्यांची कसोटी मालिकेसाठी ज्या SPO वापरण्यात आली होती तशीच या दौऱ्यासाठी देखील वापरण्यात येणार आहे. वाचा- सर्व नियम तसेच असणार आहेत जसे इंग्लंडला रवाना होण्याआधी वापरण्यात आले होते. बाहेरच्या राज्यांतून येणारे सर्व खेळाडू चार्टर विमानाने तर काही जण बिझनेस क्लासने प्रवास करतील असे बीसीसीआयमधील एका सूत्रांनी सांगितले. सर्व खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात आल्यानंतर वेगवेगळ्या वेळेत जिमचा वापर करता येईल. वाचा- श्रीलंका दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. पहिली लढत १३ जुलै रोजी होईल. श्रीलंकेत पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंना कोलंबोत तीन दिवस हॉटेलमध्ये क्वरंटाइन रहावे लागले. वाचा- सर्व प्रक्रिया तशाच असतील जशा इंग्लंड दौऱ्यासाठी वापरण्यात आल्या. जैव सुरक्षित वातावरणात सराव केला जाईल. खेळाडूंना दौरा सुरू होण्याआधी सराव सामन्याची गरज असते. पण या दौऱ्यात सराव लढती होणार नाही, असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले. भारतीय खेळाडू अनेक वर्षापासून कोलंबोमधील ताज समुद्र हॉटेलमध्ये थांबते. दौऱ्याचा कार्यक्रम वनडे मालिका- पहिली वनडे १३ जुलै, दुसरी वनडे १६ जुलै तिसरी १८ जुलै टी-२० मालिका- पहिली लढत २१ जुलै दुसरी लढत २३ जुलै तिसरी लढत २५ जुलै
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35fKsjU
No comments:
Post a Comment