साउथम्पटन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी रात्री भारताचे महिला आणि पुरुष संघातील खेळाडू मुंबईतून इंग्लंडला रवाना झाले होते. लंडनमधील हिथ्रो विमानतळावर पोहोचल्यानंतर भारताचे खेळाडू साउथम्पटनकडे रवाना झाले. वाचा- भारताचा पुरुषांचा संघ १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध विरुद्ध खेळणार आहे. तर महिलांचा संघ १६ जूनपासून ब्रिस्टल येथे इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळले. त्यानंतर ते तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. वाचा- भारतीय संघाचा मुंबई ते साउथम्पटन या प्रवासाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीय खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय देखील दिसतात. व्हिडिमध्ये भारतीय खेळाडूंचा विमानात आणि त्यानंतर हिथ्रो येथे उतरल्यानंतर बसने साउथम्पटन पर्यंतचा प्रवास दाखवला आहे. या व्हिडिओत अक्षर पटेलने सांगितल्यानुसार भारतीय खेळाडूंना पहिल्या तीन दिवसात एकमेकांना भेटण्याची देखील परवानगी नाही. त्यानंतर टप्प्या टप्प्याने भारतीय खेळाडूंना करोना चाचणी करावी करावी लागले आणि त्यांना काही गोष्टींमध्ये सवलत मिळले. वाचा- असे आहे वेळपत्रक WTC फायनल न्यूझीलंडविरुद्ध- १८ ते २२ जून (वेळ-पहाटे साडे तीन), साउथम्पटन इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका >> पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम >> दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स >> तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स >> चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल >> पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धीमान साहा स्टॅडबाय खेळाडू- अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाल
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RmPojB
No comments:
Post a Comment