Ads

Friday, June 4, 2021

क्रिकेट खेळण्यासाठी घर आणि गाडी विकली होती; आता कसोटीत इतिहास घडवला

लंडन: मार्च २०१७मध्ये जोहान्सबर्गच्या वॉडरर्स स्टेडियमवर २६ वर्षीय याने देशांतर्गत क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेतील हा त्याचा अखेरचा सामना होता. त्यानंतर तो न्यूझीलंडकडून खेळणार होता. वाचा- न्यूझीलंडमध्ये गेल्यावर मात्र त्याचे नशिब बदलले. जी गोष्टी त्याला दक्षिण आफ्रिकेत राहून मिळाली नसती ती न्यूझीलंडमध्ये मिळाली. इतक नाही तर यासाठी कॉन्वेने स्वत:चे घर आणि गाडी देखील विकली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर कॉन्वेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघ तर सोडाच तर लीग क्रिकेटमध्ये देखील संधी मिळाली नाही. त्याने लायन्सकडून १२ सामने खेळले, यात एका अर्धशतकाचा समावेश होता. आफ्रिकेच्या देशांतर्गत संघात देखील तो आत बाहेर असायचा. वाचा- संघात माझे स्थान निश्चित नव्हते. वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो. टी-२० मध्ये सलामीवीर, वनडेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायचो. संघातील एखादा खेळाडू जेव्हा बाहेर असायचा तेव्हा मी संघात असायचो. मी जवळ जवळ प्रत्येक क्रमांकावर फलंदाजी केली आहे, असे कॉन्वेने सांगितले. वाचा- एक विदेशी खेळाडू म्हणून कॉन्वे मोठ्या कालावधीपासून इंग्लंडमध्ये खेळत होता. पण आफ्रिकेतून न्यूझीलंडकडून खेळण्याचा निर्णय घेण्यास त्याचे जवळचे दोन मित्र मॅल्कम नोफल आणि मायकल रिपन यांच्या मदतीने घेतला. कॉन्वेला कल्पना देखील नव्हती की तो कधी न्यूझीलंडकडून खेळले. वाचा- दक्षिण आफ्रिकेत कधीच त्याला सन्मान मिळाला नाही. पण न्यूझीलंडमध्ये मात्र त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळाली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा केल्यानंतर राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. प्रथम टी-२० नंतर वनडे आणि आता कसोटी संघात सलामीवीर म्हणून खेळताना त्याने इंग्लंडविरुद्ध द्विशतक करून इतिहास घडवला. २०१० साली दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षाखाली संघात क्विंटन डीकॉक आणि तेम्बा बावुमा यांच्यात स्पर्धेत कॉन्वे मागे पडला. या दोघांना राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. पण कॉन्वेला लीग स्पर्धेत स्थान मिळवण्यात संघर्ष करावा लागला. कॉन्वे ऑगस्ट २०१७ मध्ये वेलिंग्टनमध्ये पोहोचला. तेथील व्हिक्टोरिया विद्यापीठातील क्रिकेट क्लबमध्ये दाखल झाला. वाचा- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात द्विशतक करणारा तो फक्त सातवा फलंदाज ठरला आहे. इतक नव्हे तर पदार्पणाच्या कसोटीत पहिल्याच दिवशी शतक करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने लॉर्ड्स मैदानावर पदार्पण करताना सर्वाधिक धावा करण्याचा सौरव गांगुलीचा विक्रम देखील मागे टाकला. कॉन्वेने ३४७ चेंडूत २२ चौकार आणि १ षटकारासह २०० धावा केल्या. पहिल्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज टीप फॉस्टर- २८७ जॅक्स रुडोल्ड-२२२ नाबाद लॉरेन्स रोव्ह-२१४ मॅथ्यू सिंक्लेअर- २१४ कायले मॅयर्स-२१० नाबाद ब्रेंडन कुरुप्पू-२०१ नाबाद डेवॉन कॉन्वे- २००


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pjJjAU

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...