नवी दिल्ली: अंपायनरने अपील फेटाळून लावल्याने विकेटवर लाथ मारून त्याच्या अंगावर जाणाऱ्या शाकिब अल हसनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात शाकिबने जंटलमन खेळाची लाज काढली होती. वाचा- बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्टार खेळाडू शाकिबवर चार सामन्यांची बंदी घेतली आहे. यामुळे त्याला ढाका प्रीमिअर लीगमधील चार सामने खेळता येणार नाही. यासंदर्भात बांगलादेश बोर्डाने अधिकृत पत्रक जारी केले नाही. पण मोहम्मदन स्पोटिंग क्लब क्रिकेट समितीचे अध्यक्ष मसूदुज्जमा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वाचा- शाकिब प्रकरणात ते म्हणाले, बोर्डाकडून कोणतेही अधिकृत पत्रक जारी करण्यात आलेले नाही. पण आम्हाला सांगण्यात आले आहे की, अंपायर समितीने चार सामन्यांच्या बंदीची शिफारस केली आहे. जे झाले ते अयोग्य होते. पण आपल्याला हे देखील समजून घेतले पाहिजे की असे का झाले. शाकिब कट्टर प्रतिस्पर्धी अबाहानी लिमिटेडविरुद्ध खेळत होता. आणि दोन प्रसंगात अंपायरशी वाद घातला. वाचा- ढाका प्रीमिअर लीग स्पर्धेत मोहम्मदन स्पोटिंग क्लबकडून खेळणाऱ्या शाकिबच्या चेंडूवर अंपायरने अपील फेटाळली आणि फलंदाज मुशफिकर रहिमला नाबाद ठरवले. अपील फेटाळल्यानंतर संतापलेल्या शाकिबने रागाच्या भरात विकेटवर लाथ मारली आणि तो अंपायरच्या अंगावर धावून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. शाकिबचा फेसबुकवर माफिनामा सर्व चाहत्यांची मी यावेळी माफी मागतो. कारण सामना सुरु असताना माझा माझ्यावरील ताबा सुटला होता. माझ्यामुळे या सामन्याला गालबोट लागले. जे चाहते टीव्हीवरुन हा सामना पाहत होते, त्यांना नक्कीच ही गोष्ट आवडली नसणार. माझ्यासारख्या क्रिकेट विश्वातील अनुभवी खेळाडूकडून असे होता कामा नये. पण माझ्याकडून ही चुक घडली आहे. पण क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी घडत असतात ज्या दुर्देवी असतात. मी माझ्या संघाची, संघ व्यवस्थापनाची, स्पर्धेच्या संयोजन समितीची माफी मागतो. त्याचबरोबर माझ्याकडून अशी चुक भविष्यात घडणार नाही, हेदेखील सांगतो. आतापर्यंत तुम्ही जो मला पाठिंबा दिलात, त्याबद्दल आभार. ही पहिली वेळ नाही याआधी २०१७ मध्ये शाकिबने मैदानावरील अंपायरला शिविगाळ केली होती. त्यामुळे एक वर्षाची बंदी घातली गेली होती. इतकच नाही तर २०१९ साली आयसीसीने त्याच्यावर तीन प्रकरणात दोन वर्षाची बंदी घातली. शाकिबचा राग जगजाहीर आहे. तो चाहत्यांसोबत देखील भिडला आहे. शाकिबने बांगलादेशकडून ५७ कसोटी, २१२ वनडे आणि ७६ टी-२० सामने खेळले आहेत. शाकिब आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cyB12L
No comments:
Post a Comment