लंडन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल () आधी भारतीय संघातील खेळाडूंनी एकत्र सराव करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय संघातील २४ खेळाडूंनी दोन गट तयार करून एक सराव सामना खेळला. खेळाडूंसाठी हा सराव सामना असला तरी यात क्रिकेटपटूंनी जोरदार कामगिरी केली. सामन्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून WTC फायनल होणार आहे. त्याआधी न्यूझीलंड संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. तर भारतीय संघ थेट मैदानावर उतरले. यामुळेच संघातील खेळाडूंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. वाचा- भारतीय खेळाडूंमध्ये झालेल्या या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात चांगली लढत पाहायला मिळाली. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत ऋषभ पंत ()ने त्याच्या नेहमीच्या स्टाइलने षटकार मारले. इतक नव्हे कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांनी देखील चांगली फलंदाजी केली. वाचा- भारतीय संघाचा हा व्हिडिओ पाहून चाहते देखील आनंदी झाले आहेत. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह देखील गोलंदाजी करताना दिसले. त्याच बरोबर आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी देखील या सराव सामन्यात संधी सोडली नाही. व्हिडिओमध्ये सलामीवीर शुभमन गिल, अजिंक्य रहाणे यांची फलंदाजी देखील पाहायला मिळते. वाचा- बीसीसीआयकडून WTC फायनलसाठीची भारतीय संघाच्या तयारीचे सर्व अपडेट सोशल मीडियावर दिले जात आहे. खेळाडूंनी मुंबईतून प्रवास सुरू केल्यापासून ते इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतरचा खेळाडूंचा सराव याचे फोटो आणि व्हिडिओ बीसीसीआय शेअर करत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zouS2Y
No comments:
Post a Comment