Ads

Monday, June 7, 2021

IPL 2021 : आयपीएलची फायनल दसऱ्याला का खेळवणार, जाणून घ्या महत्वाचं कारण...

नवी दिल्ली : आयपीएलची फायनल यावर्षी दसऱ्याला म्हणजेच १५ ऑक्टोबरला खेळवण्यासाठी बीसीसीआय उत्सुक आहे. पण आयपीएलची फायनल दसऱ्याला का खेळवायची, याचे महत्वाचे कारणही आता समोर आले आहे. बीसीसीआयला आयपीएल खेळवण्यासाठी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर एवढी कालावधी मिळाला आहे. बीसीसीआयने १९ सप्टेंबरला आयपीएलचा पहिला सामना खेळवण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला आयपीएलची फयनल १० ऑक्टोबरला खेळवण्याचे बीसीसीआय ठरवत होती, पण आता त्यांनी फायनल १५ ऑक्टोबरला खेळवण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबतचे मुख्य कारण आता समोर आले आहे. आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात ३१ सामने होणार आहेत आणि यामध्ये १० डबल हेडरचा (एकाच दिवशी दोन सामने) समावेश आहे. पण ही आयपीएल युएईमध्ये होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना जर झटपट सामने खेळायला लावले तर त्यांना थकवा जाणवू शकतो. त्यामुळे जर फायनल १५ ऑक्टोबरला खेळवण्यात आली तर १० पैकी ५-६ डबल हेडरचे सामने रद्द करता येऊ शकतात आणि खेळाडूंची जास्त दमछाक होणार नाही. त्यामुळे १५ ऑक्टोबरला आयपीएलची फायनल व्हावी, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्टही समोर आली आहे. शुक्रवारी १५ ऑक्टोबर येत आहे. त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये शुक्रवारी विकेंड सुरु असतो. युएईमध्ये शुक्रवारी सुट्टीही असते. त्यामुळे जर शुक्रवारी अंतिम फेरीचा सामना झाला तर तो जास्त चाहत्यांना पाहता येईल, हादेखील यामागचा एक उद्देश आहे. त्यामुळेच १५ ऑक्टोबरला आयपीएल अंतिम फेरी खेळवण्यात यावी, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत असून त्यांची युएईच्या क्रिकेट मंडळाबरोबर चर्चाही सुरु आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, " बीसीसीआय आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये आयपीएलबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा सकारात्मक होत आहे. त्यामुळे आयपीएलचे दुसरे पर्व यशस्वी होऊ शकेल, असा विश्वास बीसीसीायला आहे." अमिराती क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला आयपीएल आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात ही मंजूरी मिळालेली आहे. कारण आयपीएलचे ३१ सामने आता शिल्लक आहेत आणि त्यासाठी बीसीसीआय २५ दिवसांचा कालावधी पाहत होते. त्यांना आता हा कालावधी मिळाला असून अमिराती क्रिकेट मंडळाकडूनही आता त्यांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या प्रक्रियेला बीसीसीआय सुरुवात करणार आहे. त्यासाठी खेळाडूंना कसं आणि कुठे बोलवायचं आणि त्यांनी व्यवस्था कशी करायची, यावर बीसीसीआय आता विचार करत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34VeIQL

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...