साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पावसाने अडथळा आणला आहे. यामुळे अद्याप नाणेफेक देखील झालेली नाही. आयसीसीने दिलेल्या अपडेटनुसार पहिल्या सत्राचा खेळ होणार नाही. वाचा- साउदम्प्टन येथे काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवसात हवामान विभागाने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अशात आणि केन विलियमसन हे दोन्ही कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडतील ज्यामुळे कसोटी सामन्यावर वर्चस्व ठेवता येईल. वाचा- द रोझ बाउल मैदानावर आतापर्यंत सहा कसोटी सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ दोन वेळा तर नंतर फलंदाजी करणारा संघ एकदा जिंकला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतील. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीचा नाणेफेकीचा कौलबाबत फार चांगले रेकॉर्ड नाही. आतापर्यंत तिनही प्रकारात २०० सामन्यात त्याने नेतृत्व केले आहे. त्यापैकी फक्त ८५ सामन्यात विराटने टॉस जिंकला आहे. ११५ सामन्यात नाणेफेकीचा कौल त्याच्या विरुद्ध लागलाय. भारताच्या कर्णधारामध्ये ही सरासरी सर्वात खराब आहे. वाचा- भारतीय क्रिकेट संघ प्रथमच एका तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळत आहे. याआधी टीम इंडियाने वनडे आणि टी-२० सामने तटस्थ ठिकाणी खेळले आहेत. भारतीय संघाने साउदम्प्टन मैदानावर दोन कसोटी सामने खेळले आहेत या दोन्ही कसोटीत भारताचा पराभव झाला होता. तर न्यूझीलंडचा संघ या मैदानावर पहिलीच कसोटी खेळतोय. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vAjTjR
No comments:
Post a Comment