म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘भारतीय संघात अंतिम अकरामध्ये स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा तीव्र आहे. मात्र, या क्षणी डोक्यात कुठलाच विचार नाही. संधी मिळाल्यास सर्वोत्तम कामगिरी करून निवड समितीने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविणार आणि मिळालेल्या संधीचे सोने करणार,’ असे मत याने व्यक्त केली. ऋतुराजची पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधताना ऋतुराजने आपल्या भावना व्यक्त केल्या. या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम अकरासाठी जबरदस्त चुरस असेल. मात्र, सध्या तरी ऋतुराजला अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल की नाही, याचा विचार करायचा नाही. त्याची दौऱ्याच्या तयारीची सुरुवात झाली आहे. सध्या तो तळेगाव येथील डी. वाय. पाटील मैदानावर सराव करीत आहे. आयपीएलचा मोठा फायदा झाल्याचे ऋतुराज आवर्जून नमूद करतो. तो म्हणाला, ‘आयपीएलमधील प्रवास मला अनेक चढ-उतार बघायला मिळाले. यश-अपयश दोघांचा सामना करता आला. चेन्नईकडून खेळताना अनेक गोष्टी शिकता आल्या. धोनीपासून डुप्लेसिसपर्यंत अनेकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. खरे तर माझे कौशल्य दाखविण्यासाठी आयपीएल हे चांगले व्यासपीठ ठरले.’ वाचा- अनेक माजी कर्णधार आणि समालोचकांनी ऋतुराजचा आय़पीएलमधील तंत्रशुद्ध आणि आक्रमक फलंदाजी पाहून भविष्यात भारतीय संघात नक्की स्थान मिळू शकले, असा अंदाज वर्तविला होता. आपल्याकडून जेव्हा अशा अपेक्षा बाळगल्या जातात, तेव्हा दडपण येते का, असे विचारले असता २४ वर्षीय ऋतुराज म्हणाला, ‘दडपण कधीच येत नाही. उलट सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. या दिग्गजांनी तुमच्यातील चांगले गुण हेरले आहेत, याची जाणीव होते.’ पुणेकर ऋतुराजने आवड म्हणून क्रिकेटला सुरुवात केली. व्हेरॉक वेंगसरकर अॅकॅडमीतून या प्रवासाला सुरुवात झाली. कारकिर्दीत जसे एक-एक टप्पे तो गाठू लागला, तसे त्यालाही भारतीय संघात स्थान मिळविण्याचे वेध लागले. अर्थात, सर्वोत्तम कामगिरी, कामगिरीत सातत्य आणि मेहनतीच्या जोरावरच हे शक्य असल्याचे त्याला माहिती होते. भारत अ दौरे, प्रथम श्रेणी क्रिकेट, आयपीएल यातील कामगिरीने त्याचा आत्मविश्वास उंचावला आणि भारताची जर्सी त्याच्याही डोळ्यासमोर येऊ लागली. म्हणूनच भारतीय संघात निवड झाल्याच्या बातमीने तो भावूक झाला आहे. अंतिम अकरामध्ये संधी नाही मिळाली, तर खूप काही शिकूनच परत येणार असल्याचे ऋतुराज आत्मविश्वासने सांगतो. वाचा- यांच्या भेटीसाठी उत्सुक जुलैमधील श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ तीन वन-डे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी राहुल द्रविड हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील. तेव्हा द्रविड यांच्याशी संवाद साधण्यासाठी ऋतुराज उत्सुक आहे. तो म्हणाला, ‘दीड वर्षांपूर्वी मी भारत अ दौरा केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा द्रविड सरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सर्वांना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्याकडून खूप काही शिकता येईल. विलगीकरणाच्या दरम्यान त्यांच्याशी कुठल्या गोष्टीवर चर्चा करायची याचा नक्की विचार करणार.’ दृष्टिक्षेप... - परिस्थितीनुसार खेळ करण्याची क्षमता. प्रसंगी आक्रमक होऊ शकतो किंवा बचावात्मक खेळही करू शकतो, असो विश्वास ऋतुराजला आहे. - सारे श्रेय आई-वडील, प्रशिक्षक, मित्र-परिवाराला आहे. आई-वडिलांनी जे कष्ट घेतले आहेत, ते सार्थ ठरविण्याचा प्रयत्न असल्याचे ऋतुराजने सांगितले. - आयपीएल स्थगित झाल्यानंतर काही वेळ कुटुंबीयांसोबत घालवून क्रिकेटपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. - लॉकडाउननंतर थोडी शिथिलता मिळाल्यानंतर पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3izIOkK
No comments:
Post a Comment