ढाका: बांगलादेशचा अनुभवी ऑलराउंडर याने शुक्रुवारी झालेल्या सामन्यात जंटलमन अशी ओळख असलेल्या संपूर्ण क्रिकेट विश्वाची मान झुकवली. सामन्यात अंपायरने दिलेला निर्णयावर नाराजी व्यक्त करताना त्याने थेट विकेटवर लाथ मारली आणि वाद घातला. ढाका प्रीमिअर लीग स्पर्धेत मोहम्मदन स्पोटिंग क्लबकडून खेळणाऱ्या शाकिबच्या चेंडूवर अंपायरने अपील फेटाळली आणि फलंदाज मुशफिकर रहिमला नाबाद ठरवले. अपील फेटाळल्यानंतर संतापलेल्या शाकिबने रागाच्या भरात विकेटवर लाथ मारली आणि तो अंपायरच्या अंगावर धावून गेला. वाचा- या घटनेनंतर शाकिबने माफी मागितली, पण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हो आहे असून त्याच्या या वर्तनावर टीका देखील होत आहे. या प्रकरणात आता शाकिबची पत्नी उम्मी अहमद शिशिरने उडी घेतली आहे. शाकिबवर सर्वजण टीका करत असताना त्याची पत्नी उम्मी बचावासाठी पुढे आली आहे. फेसबुक पेजव तिने या घटेबद्दल लिहले आहे की, या घटनेचा मी तितका आनंद घेत आहे जितका मिडिया घेत आहे. अखेर या सर्व टीव्हीवरील बातम्या आहेत. पण लोकांचा पाठिंबा पाहून छान वाटते. आजच्या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली की कमीत कमी कोणाच्या विरुद्ध तरी उभे राहण्याची हिम्मत झाली. अर्थात वाइट याचे वाटते की मीडियाकडून मुख्य मुद्दा दाबला जातो. केवळ त्याचा (शाकिब) राग दाखवला जातोय. वाचा- शाकिबची माफी या घटनेनंतर शाकिब म्हणाला, सर्व चाहत्यांची मी यावेळी माफी मागतो. कारण सामना सुरु असताना माझा माझ्यावरील ताबा सुटला होता. माझ्यामुळे या सामन्याला गालबोट लागले. जे चाहते टीव्हीवरुन हा सामना पाहत होते, त्यांना नक्कीच ही गोष्ट आवडली नसणार. माझ्यासारख्या क्रिकेट विश्वातील अनुभवी खेळाडूकडून असे होता कामा नये. पण माझ्याकडून ही चुक घडली आहे. पण क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी घडत असतात ज्या दुर्देवी असतात. मी माझ्या संघाची, संघ व्यवस्थापनाची, स्पर्धेच्या संयोजन समितीची माफी मागतो. त्याचबरोबर माझ्याकडून अशी चुक भविष्यात घडणार नाही, हेदेखील सांगतो. आतापर्यंत तुम्ही जो मला पाठिंबा दिलात, त्याबद्दल आभार. वाचा- बंदीची शक्यता या सामन्यात मोहम्मदन स्पोटिंगने डकवर्थ लुईस पद्धतीने विजय मिळवला. आता ३४ वर्षीय बांगलादेशच्या कर्णधाराने माफी मागितली असली तरी त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RL4L5o
No comments:
Post a Comment