लॉर्ड्स: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आज (२ जून) पासून सुरुवात झाली. लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वाचा- न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरूवात फार समाधनाकारक झाली नाही. ११४ धावात त्यांनी ३ विकेट गमावल्या. पहिली विकेट ५८ धावांवर गमावल्यानंतर जेम्स अँडरसनने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. त्याने न्यूझीलंडची वॉल समझल्या जाणाऱ्या कर्णधार केन विलियमसनची विकेट घेतली. वाचा- अँडरसनने केनला फक्त १३ धावांवर बाद केले. ही त्याची कसोटीमधील ६१५वी विकेट ठरली. अँडरसनने केनला टाकलेला चेंडू फार खास असा नव्हता. पण चेंडू बॅटला लागून विकेटला लागला. कसोटीत अँडरसनने केनला सातव्यांदा बाद केले. केन बाद झाला तेव्हा न्यूझीलंडने ८६ धावा केल्या होत्या. वाचा- कसोटीत पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिन्सने टॉम लॅथमला २४ धावांवर बाद करून इंग्लंडला पहिले यश मिळून दिले. त्यानंतर त्याने अनुभवी रॉस टेलरची विकेट घेत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. वाचा- या सामन्यात अँडरसनने इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम माजी कर्णधार अॅलेस्टर कुकच्या नावावर आहे. त्याने देखील प्रमाणे इंग्लंडकडून १६१ कसोटी सामने खेळले आहेत. या मालिकेत जेव्हा तो दुसरी कसोटी खेळेल तेव्हा इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम त्याच्या एकट्याच्या नावावर जमा होईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3g3atrA
No comments:
Post a Comment