लंडन: इंग्लंडचा जलद गोलंदाज ( ) यांना ७ ते ८ वर्षापूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट आता त्याच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने () त्याला मोठा झटका दिला आहे. वाचा- न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर कसोटीत पदार्पण करणाऱ्या ओलीवर सामना झाल्यानंतर बोर्डाने कारवाई केली. ओलीची चौकशी होईपर्यंत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर २०१२ आणि २०१३ मध्ये ट्विटवर पोस्ट केलेल्या पोस्टवरून ही कारवाई करण्यात आली आहे. वाचा- बोर्डाने केलेल्या या कारवाईमुळे त्याला १० जूनपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत संघात स्थान मिळणार नाही. ओलीला तातडीने इंग्लंडच्या संघाबाहेर जावे लागणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत तो काउंटी क्रिकेट खेळू शकतो. वाचा- ओलीने अशी कोणती चूक केली होती? ओलीने २०१२ ते २०१४ या काळात लिंगभेद आणि वर्णद्वेषी ट्विट केले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याने व्हिडिओद्वारे संबंधित ट्विटबद्दल माफी मागितली होती. मला माझ्या कृतीबद्दल वाइट वाटते आणि अशा पद्धतीची टिप्पणी केल्याबद्दल मला लाज वाटते. माझे मते विचारशून्य आणि बेजबाबदार होती. माझे काम हे माफी देण्या योग्य नव्हते, असे तो म्हणाला होता. वाचा- या वादामुळे ओली चर्चा आला असला तरी त्याने पदार्पणाच्या कसोटीत शानदार कामगिरी केली. पहिल्या डावात ओलीने २८ षटकात ७५ धावा देत ४ विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात १४ षटकात २६ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या. पदार्पणाच्या सामन्यात ७ विकेट घेणाऱ्या ओलीला सामन्यानंतर मात्र मोठा झटका बसला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SiVuBM
No comments:
Post a Comment