मुंबई: भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज () यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी का स्वीकारली नाही याचे कारण सांगितले. गावस्करांनी दिलेल्या कारणावर अनेक क्रिकेट चाहत्यांचा विश्वास बसणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या सुनील गावस्करांनी रविवारी सांगितले की ते खुप खराब दर्शक आहेत. मी मैदानाच्या बाहेर मोठ्या काळासाठी मॅच पाहू शकत नाही. प्रशिक्षकासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची असते. वाचा- क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये सुनील गावस्करांचे नाव घेतले जाते. निवृत्तीनंतर त्यांनी समालोचनात जम बसवला. समालोचन करत असताना ते क्रिकेटमधील बरकावे सोप्या पद्धतीने समाजावून सांगत असतात. त्याच बरोबर ते त्यांची मते स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात. भारतीय संघ २००४ साली जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा गावस्कर यांना संघाचे सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. होण्याच्या ते सर्वात जवळ तेव्हा पोहोचले होतो. वाचा- मी जेव्हा क्रिकेट खेळत होतो तेव्हा सामना पाहण्या ऐवजी वाचन अथवा लेखन करायचो. त्यामुळे मी कधीच प्रशिक्षक होण्याचा विचार केला नाही असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. मी क्रिकेटचा सर्वात खराब असा प्रेक्षक आहे. माझ्या करिअरमध्ये देखील मी असेच केले आहे. बाद झाल्यानंतर मी सामना अधून मधून पाहायचो. थोडावेळ सामना पाहिल्यानंतर चेंज रुममध्ये जाऊन काही तरी वाचत बसायचो किंवा पत्रांना उत्तरे लिहायचो. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा बाहेर येऊन सामना पहायचो. मी बॉल टू बॉल मॅच पाहू शकत नाही. जीआर विश्वनाथ आणि माझे मामा माधव मंत्री हे प्रत्येक बॉल पाहायचे. जर तुम्हाला प्रशिक्षक किंवा निवड समिती प्रमुख व्हायचे असेल तर प्रत्येक चेंडू पाहावा लागतो. यामुळेच मी कधीच त्याचा विचार केला नाही. वाचा- गावस्करांनी भारताकडून १२५ कसोटी सामन्यात ३४ शतकांच्या मदतीने १० हजार १२२ धावा केल्या. त्यांची सरासरी ५१.१२ इतकी होती. वनडे ३५.१३च्या सरासरीने ३ हजार ०९२ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cnwlg8
No comments:
Post a Comment