नवी दिल्ली: भारताचा मर्यादित षटकांचा क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात प्रत्येकी ३ सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका होणार असून या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भारताच्या या श्रीलंका दौऱ्यातील पहिली लढत १३ जुलै रोजी तर अखेरची लढत २५ जुलै रोजी होणार आहे. वाचा- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेव्हा इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत असेल तेव्हा भारताचा दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर असेल. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार आहे. पहिली वनडे १३ जुलै, दुसरी १६ तर दिसरी १८ जुलै रोजी होईल. त्यानंतर २१ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरूवात होईल. पहिली लढत २१, दुसरी २३ आणि तिसरी लढत २५ जुलै रोजी होणार आहे. करोनामुळे या सर्व लढती कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवल्या जातील. वाचा- वाचा- कुठे पाहाल या लढती श्रीलंका आणि भारत यांच्यातील या दोन्ही मालिकेचे प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे दोन संघ एकाच वेळी खेळताना दिसणार आहे. भारताच्या या दुसऱ्या संघाचे नेतृत्व कोण करणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. सलामीवीर शिखर धवन आणि फिटनेस टेस्ट पास झाला तर श्रेयस अय्यर या दोघांची नावे चर्चेत आहेत. वाचा- भारताच्या या संघात अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते. यात आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणारा चेतन साकरिया, हर्षल पटेल, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा, पृथ्वी शॉ यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. वाचा- या वर्षाच्या अखेरीस टी-२० वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे निवड समितीचे श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zhlfn1
No comments:
Post a Comment