नवी दिल्ली : सामना सुरु असताना एका क्रिकेटपटूने खेळाडूला मारहाण केली होती. त्यानंतर दोषी क्रिकेटपटूवर पाच वर्षांची बंदी घेलण्याचा निर्णय क्रिकेट मंडळाने घेतला होता. पण ही पाच वर्षांची बंदी आता १८ महिन्यांनंतर उठणार असल्याचे समजत आहे. नेमकं प्रकरण आहे तरी काय, जाणून घ्या...सामना सुरु असताना खेळाडूला शहादत हुसेनने २०१९ मारहाण केली होती. त्यानंतर क्रिकेट मंडळाने हुसेनवर पाच वर्षांची बंदी घातली होती. पण आता ही बंदी १८ महिन्यांनंतर उठणार असल्याचे समोर आले आहे. हुसनेन आतापर्यंत ३८ कसोटी आणि ५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधीत्व केले आहे. हुसेनची बंदी उठवण्याबाबत बांगलादेश क्रिकेट मंडळाने आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आता हुसेन ढाकामधील स्थानिक सामने खेळणार असल्याचे समोर आले आहे. हुसेनने मागितली होती माफीहुसेनने आपण केलेल्या मारहाणीबद्दल क्रिकेट मंडळाची माफी मागितली होती. त्यावेळी हुसेनने सांगितले होते की, " माझ्या आईची तब्येत खालावलेली आहे. त्यामुळे तिच्यावर उपचार करण्यासाठी मला पैशांची गरज आहे. त्यामुळे मला क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे आहे. मी जी गोष्ट केली त्याबद्दल मला पश्चाताप आहे. मी चुकीचा होतो. यापुढे माझ्याकडून अशी कोणतीही चुक होणार नाही. माझ्या आईला कर्करोग झाला आहे. त्यामुळे तिचे उपचार करण्यासाठी मला पैशांची गरज आहे. त्यासाठी मला क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे आहे." हुसेनची शिक्षा कमी करण्याचा विचार...हुसेनची शिक्षा कमी करण्यात यावी, याचा विचार बांगलादेश क्रिकेट मंडळ करत होते. कारण हुसेनच्या आईला कर्करोग झाला आहे आणि त्याला चित्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे संचालक अक्रम खान हे या प्रकरणाबाबत निर्णय घेऊ शकतात.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RsvFyO
No comments:
Post a Comment