नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्याबाबत एक वाद चांगलाच गाजला होता. या वादावर आता निवड समिती सदस्याने आपले मौन सोडले आहे. अनुष्कानेही या प्रकरणात उडी घेतली होती आणि जोरदार उत्तरही दिले होते. नेमकं प्रकरण आहे तरी काय...ही गोष्ट आहे २०१९ साली झालेल्या इंग्लंडमधील विश्वचषकाची. त्यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. इंजिनिअर यांनी त्यावेळी म्हटले होते की, " निवड समिती सदस्य हे विराटची पत्नी अनुष्का शर्माचे चहाचे कपही उचलतात." इंजिनिअर यांना त्यावेळी म्हणायचे होते की, कोहलीची संघात एवढी दहशत आहे की, तो जे काम सांगले ते निवड समिती करते आणि ती कोहलीच्या तालावर नाचते. हे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते. या वादावर त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष असलेल्या एमएसके प्रसाद यांनी मौन सोडले आहे. प्रसाद यांनी यावेळई नेमकं काय सांगितले, पाहा...यावेळी प्रसाद यांनी सांगितले की, " भारतीय संघाच्या निवड समितीमध्ये काम करणं, हे फार आव्हानात्मक असते. कारण तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तुम्हाला जास्त वेळेला मिळत नाही. जर एखाद्या खेळाडूकडून चांगली कामगिरी होत नसेल आणि त्याला संघातून बाहेर काढले तर तुमच्यावर जोरदार टीका होता. अनुष्काच्या प्रकरणामध्ये काहीही कारण नसताना निवड समितीचे नाव घेण्यात आले. त्यावेळी निवड समितीचा त्यामध्ये काहीही संबंध नव्हता. जेव्हा संघ चांगली कामगिरी करतो तेव्हा मात्र सर्व जण निवड समितीला विसरतात. हीच गोष्ट ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतरही पाहायला मिळाली. आम्ही जे काम करतो ते बाहेरच्या लोकांना दिसत नाही, फक्त काही वाईट गोष्ट झाल्यावरच आमच्याकडे बोट दाखवण्यात येते." अनुष्काने आपल्या टीकेनंतर काय म्हटले होते, जाणून घ्या...अनुष्काने त्यावेळी म्हटले होते की, " मी संघाबरोबर असताना जर वाईट कामगिरी झाली, तर काही लोकं मला दोष देतात. त्याचबरोबर माझ्याबाबत चुकीच्या गोष्टीही पसरवल्या जातात. मी शांत राहते, याचा अर्थ माझी त्यामध्ये चुक असते असा होत नाही. पण माझ्या नावाचा आतापर्यंत बऱ्याचदा चुकीचा वापर करण्यात आला आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vh5hWA
No comments:
Post a Comment