मुंबई: क्रिकेट त्यात ही कसोटी क्रिकेटचा इतिहास सर्वात जुना आहे. अशा क्रिकेटमधील अनेक किस्से आणि विक्रम तुम्ही वाचले असतील पाहिले असतील. पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा एकच सलामीवीर झाला आहे जो कधीच बाद झाला नाही. इंग्लंडचे क्रिकेटपटू असे एकमेव फलंदाज आहेत जे कसोटी क्रिकेटमध्ये कधीच बाद झाले नाहीत. त्याच्या या नाबाद राहण्यामागे एक रंजक किस्सा आहे. वाचा- लॉयड यांनी कसोटी करिअरची पहिली मॅच बर्मिंघम मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती. पहिल्या कसोटीत ते सलामीवीर म्हणून आले तेव्हा एक घटना घडली. १० धावांवर फलंदाजी करत असताना लॉयड यांच्या हेल्मेटला वेस्ट इंडिजचे जलद गोलंदाज मॅल्कम मार्शल यांचा चेंडू लागला. यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि फलंदाजी सोडावी लागली. वाचा- लॉयड यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि बराच काळ ते रुग्णालयात होते. त्यानंतर लॉयड कधीच कसोटी सामना खेळू शकले नाहीत. पहिलीच कसोटी त्याची अखेरची कसोटी ठरली. त्यांना झालेली दुखापत इतकी गंभीर होती की त्याची पहिली कसोटीत आणि शेवटची कसोटी ठरली. यामुळे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ते एकमेव सलामीवीर आहेत जे कधीच बाद झाले नाहीत. लॉयड त्याच्या पहिल्या आणि अखेरच्या कसोटीत रिटायर्ट हर्ट झाले. त्यांनी आजच्या दिवशी (१४ जून) १९८४ साली कसोटीत पदार्पण केले होते. वाचा- वाचा- आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये त्यांनी ३ वनडे सामने खेळले होते. त्यात १०१ धावा केल्या होत्या. ४९ ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भलेही लॉयड यांना फार चमकदार कामगिरी करता आली नसली तरी प्रथम श्रेणीत त्यांनी ३१२ सामन्यात १७ हजार २११ धावा केल्या होत्या. यात २९ शतक आणि ८७ अर्धशतक होती. लिस्ट ए मध्ये २८७ सामन्यात २ शतक आणि ५६ अर्धशतकासह ७ हजार ५६२ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xq6mgp
No comments:
Post a Comment