नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यावेळी चक्क घोड्याबरोबरच धावण्याची रेस लावल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट बऱ्याच जणांना खरी वाटणार नाही. पण या गोष्टीचा व्हिडीओ धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. आयपीएल स्थगित झाल्यावर धोनी आपल्या घरीच गेला होता. पण त्याचवेळी धोनीने आपल्या घरी एक घोडा आणला होता, त्याचा फोटो धोनीची मुलगी झिवाने पोस्ट केला होता. साक्षीने आता जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये धोनी हा या घोड्याबरोबर धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. धोनीचे प्राणीप्रेम हे सर्वांनाच परिचीत आहे. धोनीने आपल्या फॉर्म हाऊसवर आणलेला हा दुसरा घोडा आहे. यापूर्वी धोनीने चेतक नावाचा एक घोडा आणला होता. त्याचा फोटो साक्षीनेच सोशल मीडियावर शेअर केला होता. आता धोनीच्या घरी हा दुसरा पाळीव घोडा आलेला आहे. त्याचबरोबर धोनीच्या या फार्म हाऊसमध्ये चार श्वानही आहेत. धोनीचे हे फार्म हाऊस फार मोठे असून धोनी इथेच जास्त राहायला पसंती देतो. धोनीच्या फिटनेसबाबत अजून कोणीही शंका घेऊ शकत नाही. कारण धोनीचा फिटनेस हा क्रिकेट विश्वात अव्वल समजला जातो. आता तर धोनीने घोड्याबरोबर रेस लावत आपण किती फिट आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता आगामी आयपीएलच्या सामन्यांमध्ये धोनीची चपळाई अजून वाढेलली पाहायला मिळू शकते. आयपीएलच्या या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने दमदार कामगिरी केली होती. पण करोनाच्या शइकरावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली. पण आता आयपीएलचे उर्वरीत ३१ सामने युएईला खेळवण्यात येणार आहेत. हे सामने सप्टेंबर महिन्यामधअये होतील, असे म्हटले जात आहे. गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये धोनीच्या संघाला चांगली कामगिरी करताआली नव्हती. त्यामुळे या वर्षी युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांची कामगिरी कशी होते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gjEOUc
No comments:
Post a Comment