मुंबई: कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणे ही गोष्ट प्रत्येक खेळाडूसाठी खास अशी असते. एखाद्या खेळाडूंना जर कसोटीमध्ये केले तर ती गोष्ट त्याच्या करिअरमधील सर्वोच्च अशीच ठरते. क्रिकेटमधील खेळाडूंची कसोटी घेणाऱ्या या प्रकारात जेव्हा एखादा खेळाडू फलंदाजीतील क्लास दाखवते तेव्हा तो पिचवर टिकू शकतो. कसोटीत सर्वाधिक द्विशतक करण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी करिअरमध्ये एकूण १२ द्विशतक केली आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिले द्विशतक ऑस्ट्रेलियाच्या बिली मर्डोक यांच्या नावावर आहे. त्यांनी १९८४ साली ही कामगिरी केली होती. न्यूझीलंडच्या डेव्होन कॉन्वे याने इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या पहिल्या कसोटीत पदार्पणातच द्विशतक झळकावले होते. वाचा- खेळाडूंच्या द्विशतकाबद्दल सर्वांना माहिती असते. पण क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्या संघातील खेळाडूंनी द्विशतक झळकावले आहे याच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १०) झिम्बाब्वे- कसोटीत झिम्बाब्वेकडून आतापर्यंत चार द्विशतक झाली आहेत. त्यानंतर अफगाणिस्तानचा क्रमांक लागतो त्यांच्याकडून एकमेव द्विशतक हशमतुल्ला शाहिदीने केले आहे. ९) बांगलादेश- या क्रमावारीत बांगालदेश ९व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या एकूण ५ फलंदाजांनी द्विशतकी खेळी केली आहे. यातील मुशफिकुर रहीनच्या नावावर ३ द्विशतक आहेत. वाचा- ८) दक्षिण आफ्रिका- कसोटीत आफ्रिकेकडून २९ द्विशतक झळकावली गेली आहेत. माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या नावावर सर्वाधिक पाच द्विशतक आहेत. ७) न्यूझीलंड- सातव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडकडून २९ वेळा द्विशतक झाली आहेत. ब्रॅडन मॅक्कलमने सर्वाधिक ४ द्विशतक केली आहेत. तर विद्यमान कर्णधार केनच्या नावावर देखील चार द्विशतक आहेत. वाचा- ६) श्रीलंका- सहाव्या स्थानावर असलेल्या लंकेकडून ३६ द्विशतक झाली आहेत. लंकेकडून कुमार संगकाराने ११ द्विशतक केली आहेत. ब्रॅडमन यांच्यानंतर संगकाराचा क्रमांक लागतो. वाचा- ५) पाकिस्तान- कसोटीत पाककडून ४४ वेळा द्विशतक झाली आहेत. जावेद मियादाद आणि युनिस खान यांनी पाककडून प्रत्येकी ६ वेळा अशी कामगिरी केली आहे. ४) वेस्ट इंडिज- चौथ्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजकडून ५३ वेळा द्विशतक झळकावले गेले आहे. यात सर्वाधिक द्विशतक लाराच्या नावावर आहेत. त्याने ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. वाचा- ३) भारत- कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून ६१ वेळा द्विशतक झाली आहेत. यात सर्वाधिक द्विशतक करण्याचा विक्रम विराटच्या नावावर असून त्याने ७ वेळा अशी कामगिरी केली आहे. सचिन, सेहवाग यांनी प्रत्येकी ६ वेळा, राहुल द्रविडने ५ तर गावस्कर यांनी ४ वेळी द्विशतक केले होते. २) इंग्लंड- ६१ द्विशतकासह इंग्लंडचा संघ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडकडून एलिस्टेअर कुक आणि जो रुट यांनी प्रत्येकी ५ द्विशतक केली आहेत. वाचा- १) ऑस्ट्रेलिया- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक द्विशतक करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. या संघाने एकूण ७५ वेळा अशी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून ब्रॅडमन यांनी सर्वाधिक १२, रिकी पॉन्टिंगने ६, ग्रॅग चॅपल, मायकल क्लार्क यांनी प्रत्येकी चार द्विशतक केली आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ird5Ci
No comments:
Post a Comment