नवी दिल्ली: भारताचा सलामीवीर आणि क्रिकेट विश्वात हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा १५०हून अधिक धावा करणारा आणि सर्वाधिक द्विशतक झळकावणाऱ्या रोहितने करिअरमधील पहिले अर्धशतक मात्र दुसऱ्या फलंदाजाच्या बॅटने केले होते. वाचा- तुम्हाला देखील वाचून आश्चर्य वाटले पण हे खरं आहे की रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे पहिले अर्धशतक स्वत:च्या बॅटने नव्हे तर संघातील अन्य एका फलंदाजाच्या बॅने केले होते. २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीत रोहितने अर्धशतक केले होते. या लढतीबद्दल सांगताना भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज म्हणाला, पाचव्या षटकात मी पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झालो. मी डगआउटमध्ये आल्यानंतर रोहितने माझ्याकडून बॅट मागितली. त्या सामन्यात रोहितने ४० चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या. रोहितने महेंद्र सिंह धोनीसोबत ८५ धावांची भागिदारी देखील केली. धोनी ३३ चेंडूत ४५ धावा करून धावबाद झाला होता. वाचा- रोहितचे पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक माझ्या बॅटीतून आले होते. मला त्याचा फार अभिमान वाटतो. हो मी त्या बॅटीने फलंदाजी करायचो. मी त्याला म्हटले होते की, काय बेक्कार बॅट आहे ही यार. त्यावर तो म्हणाला, काय? तुला वाटत नाही का चांगली बॅट आहे? नको असेल तर मला दे. वाचा- त्यानंतर ती बॅट मी त्याला दिली. वर्ल्डकपमध्ये रोहितने त्या बॅटने धमाकेदार फलंदाजी केली. अर्थात त्याचे श्रेय माझ्या बॅटीचे नाही, तर रोहितचे आहे. पण तरी देकील. या गोष्टी खुप महत्त्वाच्या असतात. वाचा- आफ्रिकेविरुद्धच्या त्या लढतीत रोहितच्या अर्धशतकामुळे भारताने ५ बाद १५३ धावसंख्या उभी केली. रोहित मैदानावर आला तेव्हा भारताच्या ११ षटकात ४ बाद ६१ धावा होत्या. उत्तरादाखल आफ्रिकेला २० षटाकत ११६ धावा करता आल्या. या सामन्यात रोहितला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता, अशी आठवण कार्तिकने सांगितली. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fAio0y
No comments:
Post a Comment