नवी दिल्ली : सुशील कुमार प्रकरणात आता एक वेगळे वळण आले असून एक धक्कादायक गोष्ट आता समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या तपासामध्ये आता एक मोठा खुलासा सागर आणि सुशील कुमार यांच्यामधील वादाबद्दल झाला आहे. नेमकं प्रकरण आहे तरी काय, जाणून घ्या...सुशील कुमारचा छत्रसाल स्टेडियममध्ये अंमल होता. जी गोष्ट सुशील कुमार सांगायचा तीच गोष्ट छत्रसाल स्टेडियमध्ये व्हायची. सुशील कुमारने सागर आणि कुस्ती प्रशिक्षक विरेंदर या दोघांचा अपमान केला होता. त्यामुळे या दोघांनी सुशील कुमारविरोधात एक कट करायचे ठरवले होते. सुशील कुमारच्या ताकदीला धक्का देण्यासाठी सागर आणि विरेंदर हे दोघे एकत्र आले होते. या दोघांनी मिळून छत्रसाल स्टेडियममधील तब्बल ५०-६० कुस्तीपटूंचा एक ग्रुप बनवला होता. या ५०-६० कुस्तीपटूंना छत्रसाल स्टेडियममधून बाहेर काढायचे आणि त्यांच्यासाठी एक वेगळा आखाडा सुरु करुन सुशील कुमारला शह द्यायचा, हे त्यांनी ठरवले होते. ही गोष्ट सुशील कुमारला समजली होती आणि त्याला सागर व विरेंदर यांचा राग आला होता. दुसरीकडे सागर हा सुशील कुमारच्या घरावर कब्जा करत होता. त्यामुळे घराचे कारण दाखवून सागरला धडा शिकवायचा हे सुशील कुमारने ठरवले होते. कारण एकाचवेळी जर ५०-६० कुस्तीपटू दुसऱ्या आखाड्यात गेले असते तर सुशील कुमारला मोठा धक्का बसला असता आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते. त्यामुळे सुशील कुनारने या गोष्टीचा बदला घेण्याच ठरवले होते. त्यामुळेच त्याने सागरला छत्रसाल स्टेडियमध्ये नेऊन मारहाण करण्याचा प्लॅन बनवला होता. त्यानुसार सुशील कुमार हा सागरच्या शोधात होता. त्याचबरोबर सागरला जी लोकं मदत करत होती त्यांनाही सुशील कुमारला धडा शिकवायचा होता. त्यामुळे सुशील कुमारने हे पाऊ उचलले, हे आता समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी साक्षीदारांची चौकशी केली. यामधून दिल्ली पोलिसांना ही नवीन माहिती मिळाली आहे. सोनू महालने यावेळी साक्ष देताना सांगितले की, " सुशील कुमारला सागरला धडा शिकवायचा होता. त्यामुळे तो त्याच्या शोधात होता. जेव्हा सगर आणि त्याचे मित्र सुशील कुमारच्या टहाती लागले तेव्हा त्यांना घेऊन तो छत्रसाल स्टेडियममध्ये गेला आणि त्यांना मारहाण केली."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pHSxal
No comments:
Post a Comment