मुंबई: क्रिकेटचा सामना पाहताना मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीकडे जसे लक्ष असते तसेच समालोचक काय बोलत असतो याकडे चाहत्यांचे लक्ष असते. त्यामुळेच काही समालोचकांनी चाहत्यांच्या मनात घर केल्याचे दिसते. टोनी ग्रेग, इयान चॅपल, सुनील गावस्कर , रवी शास्त्री, आकाश चोप्रा, आशिष नेहरा यांनी स्वत:ची छाप सोडली आहे. वाचा- समालोचकांच्या या दिग्गज मंडळीमध्ये एखादा मजूराचा समावेश केल्यास तुम्हाला धक्का बसेल. पण याच दिग्गज मंडळींनी त्यांच्या बोलण्यातून इतका प्रभाव पाडला आहे की एका मजूर चक्क इंग्रजीमध्ये उत्तम समोलोचन करतोय. वाचा- पाकिस्तानमधील एक मजूर ज्याने कधी शाळेची पायरी देखील पाहिली नाही तो उत्तम इंग्रजीमध्ये समालोचन करतोय. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. डेली पाकिस्तान डॉट कॉमने झाहीद नावाच्या एका मजूराची मुलाखत घेऊन त्याच्या या इंग्रजीमधील समालोचनाबद्दल जाणून घेतले. वाचा- झाहीदला क्रिकेटमधील कोणत्याही घटनेबद्दल समालोचन करण्यास सांगितल्यास तो त्या नुसार समालोचनक करून दाखवता. पाहा व्हिडिओ
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TgvlUu
No comments:
Post a Comment