नवी दिल्ली : सुशील कुमारच्या अडचणींमध्ये आता वाढ होणार आहे. कारण दिल्ली पोलिसांना केलेल्या चौकशीमध्ये आता एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. नेमकी कोणती धक्कादायक गोष्ट समोर आली, जाणून घ्या...दिल्ली पोलिसांना सुशील कुमारची कोठडी वाढवून मिळाली नाही. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आता साक्षीदारांची चौकशी करायला सुरुवात केली आहे. या साक्षीदारांमध्ये सोनू महालची साक्ष सर्वात महत्वाची समजली जात आहे. कारण सागरबरोबर सोनू महाल हा त्याच्या घरात राहत होता. त्याचबरोबर सागरबरोबर सोनूलाही छत्रसाल स्टेडियममध्ये नेण्यात आले होते. सोनूने यावेळी एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या साक्षीमध्ये सोनूने सांगितले आहे की, " सुशील चार मे रोजी सकाळी सागरला शोधत होता. त्यानंतर सागरसह त्याच्या काही मित्रांचे सुशील कुमारने अपहरण केले होते. या सर्वांना सुशील कुमार त्याच्या साथीदारांसह छत्रसाल स्टेडियमध्ये येथे घेऊन आला होता. यावेळी सुशीलने सर्वांनाच मारहाण केली होती." सोनूने आपल्या साक्षीमध्ये सांगितले आहे की, सुशील कुमारने सागरबरोबर त्याच्या मित्रांचे अपहरण केले होते. ही गोष्ट सुशील कुमारला अचडणीत आणू शकते. कारण सुशील कुमारने जर सागरचे अपहरण केल्याचे सिद्ध झाले तर त्याने हे सर्व निजोयन करुन केल्याचे समोर येईल. त्यामुळे फक्त एका दिवसात ही घटना घडलेली नाही आणि सुशील कुमार हा सागरला मारहार करण्यासाठी प्लॅनिंग करत होता, ही गोष्ट सिद्ध होऊ शकते. त्यामुळे अपहरण करण्याची बाब आता सुशील कुमारला चांगलीच महागात पडू शकते. त्यामुळे आता न्यायालयात सुशील कुमारने सागरचे अपहरण केले, ही गोष्ट सिद्ध होते की नाही, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. दिल्ली पोलिसांनी साक्षीदारांची चौकशी केली. यामधून दिल्ली पोलिसांना ही नवीन माहिती मिळाली आहे. सोनू महालने यावेळी साक्ष देताना सांगितले की, " सुशील कुमारला सागरला धडा शिकवायचा होता. त्यामुळे तो त्याच्या शोधात होता. जेव्हा सगर आणि त्याचे मित्र सुशील कुमारच्या हाती लागले तेव्हा त्यांना घेऊन तो छत्रसाल स्टेडियममध्ये गेला आणि त्यांना मारहाण केली."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wem9OY
No comments:
Post a Comment