लंडन: इंग्लंड आणि न्यूझीलंड ( 1st test) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात जलद गोलंदाज ओली रॉबिन्स ( )ने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या दिवशी ओलीने दोन विकेट घेतल्या आणि पदार्पणात चांगली कामगिरी केली. पण या कामगिरीचा आनंद साजरा करण्या ऐवजी ओलीने क्रिकेट करिअरमध्ये केलेल्या सर्वात मोठ्या चूकीबद्दल माफी मागितली. वाचा- न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ओलीने २०१२ ते २०१४ या काळात लिंगभेद आणि वर्णद्वेष संदर्भात केलेल्या ट्विटसाठी माफी मागितली. ओलीचा हा माफीनामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. वाचा- मला माझ्या कृतीबद्दल वाइट वाटते आणि अशा पद्धतीची टिप्पणी केल्याबद्दल मला लाज वाटते. माझे मते विचारशून्य आणि बेजबाबदार होती. माझे काम हे माफी देण्या योग्य नव्हते. वाचा- ओलीने हे ट्विट केल्यानंतर इंग्लिश काउंटीमधील यॉर्कशायर संघाने त्याला बाहेर केले होते. मला कल्पना नाही की ते ट्विट आता आहेत की नाहीत. पण मी प्रत्येकाशी माफी मागू इच्च्छितो. वाचा- वाचा- लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ओलीने टॉम लॅथमची विकेट घेत कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट घेतली. तर अनुभवी रॉस टेलर याला १४ धावांवर बाद करत न्यूझीलंडचा तिसरा धक्का दिला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3g84oKw
No comments:
Post a Comment