मुंबई: क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वर्णद्वेषाचा मुद्दा चर्चेत आला आहे. लॉर्ड्स मैदानावर धमाकेदार पदार्पण केल्यानंतर देखील ओली रॉबिन्सन याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने निलंबित केले. रॉबिन्सने पहिल्या कसोटीत सात विकेट घेतल्या होत्या. त्याने आठ वर्षापूर्वी केलेल्या ट्विट वरून ही कारवाई करण्यात आली. यात लिंगभेद, वर्षद्वेषी आणि महिलांसंदर्भातील आक्षेपार्ह ट्विटचा समावेश होता. वाचा- रॉबिन्सननंतर इंग्लंड संघातील काही स्टार खेळाडूंनी अशा प्रकारचे ट्विट पोस्ट केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात वनडे आणि टी-२० चा कर्णधार इयान मॉर्गन, जॉस बटलर, जेम्स एडरसन या खेळाडूंची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वाचा- इंग्लंड संघातील या प्रकरणावर १९८३ सालच्या भारताच्या वर्ल्डकप विजेत्या संघातील फलंदाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ECBने अगदी योग्य केले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मी स्वत: असा अनुभव घेतला आहे. इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असताना वर्णद्वेषाला सामोरे जावे लागले होते. वाचा- ६०च्या दशकात फारूख जेव्हा सर्वप्रथम लॉकशायर संघाकडून काउंडी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना इतरांपेक्षा वेगळ्या नजरेने पाहिले जात होते. भारतीय असल्याबद्दल अपमानास्पद जाणीव करून दिली जात, असे फारूख इंजिनियर म्हणाले. त्यांच्यामते एकेकाळी ब्रिटीश लोक भारतीयांना शिव्या देत असत. इंग्लंडचे माजी कसोटी सलामीवीर जेफ्री बायकॉट सर्वांसमोर भारतीय लोकांना ब्लडी इंडियन म्हणत असत. वाचा- जेव्हापासून आयपीएलची सुरुवात झाली तेव्हापासून ब्रिटिश लोक भारतीयांसोबत चांगले वागू लागले. त्यांना भारताबद्दल प्रेम वाटू लागले. वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या फारूख यांनी यावेळी देखील असेच एक विधान केले. ब्रिटिश लोक आता पैशांसाठी आपले तळवे चाटतात.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zg9BIV
No comments:
Post a Comment