नवी दिल्ली: युवा कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ऑलिंपिकपदक विजेता कुस्तीपटू याला दिल्लीतील एका न्यायालयाने दणका दिला आहे. सुशीलने तुरुंगात विशेष जेवणाची आणि पूरक आहार देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली. वाचा- न्यायाधीश सतवीर सिंह लांबा यांनी सुशील कुमारची याचीका फेटाळून लावली. युवा कुस्तीपटू सागर धनखड हत्येप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुशीलची अर्ज फेटाळताना न्यायालयाने या गोष्टी आवश्यक नाहीत असे म्हटले आहे. न्या.लांबा म्हणाले, अशा प्रकारचे जेवण आणि पूरक आहार ही आरोपची इच्छा आहे आणि ती गोष्ट गरजेची नाही. वाचा- दिल्ली जेल कायदा २०१८ नुसार आरोपींच्या गरजेनुसार तुरुंगात त्याची देखभाल केली जाते. कायद्याच्या नजरेत प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही जात, धर्म, लिंग, वर्गचा असला तरी समान असतो. समानतेचा अधिकार भारतीय घटनेचा मुख्य भाग आहे, असे देखील न्यायालयाने आदेशात म्हटले. वाचा- हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर सुशील कुमारला प्रथम काही दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. कुमारने रोहिणी कोर्टात याचिका करून विशेष जेवण, पूरक आहार आणि व्यायाम करण्यासाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. फिटनेस राखण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत असे त्याने म्हटले होते. या गोष्टी देण्यास नकार दिला तर त्याच्या करिअरवर मोठा परिणाम होऊ शकेल असे त्याने याचिकेत म्हटले होते. वाचा- यासंदर्भात तुरुंगातील अधिकाऱ्यांनी न्यायालयात स्पष्ट केले होते की सुशील कुमारचे आरोग्य पाहता त्याला पूरक आहार किंवा अतिरिक्त प्रोटीनची गरज नाही. सुशील कुमारचे वकील प्रदीप राणा यांनी यांनी कोर्टात सांगितले होते की सुशील कुमारला असा आहार मिळणे हा त्याचा अधिकार आहे. तसेच तो स्वत:च्या खर्चाने या गोष्टीची मागणी करतोय. सुशील सध्या दिल्लीच्या मंडोली तुरुंगात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Thb1SM
No comments:
Post a Comment