नवी दिल्ली: न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी फक्त आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असून भारतीय खेळाडूंनी साऊदम्प्टन येथे सराव सुरू केला आहे. भारतीय खेळाडूंना तीन आणि चार जणांच्या गटात सराव करण्यास सुरूवात केली आहे. वाचा- भारतीय संघ अद्यापही क्वारंटाइनमध्ये आहे. उद्या म्हणजे शुक्रवारपासून सर्व खेळाडूंना एकत्र सराव करता येणार आहे. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात ११ खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराजचा समावेश करण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिराजचा संघात समावेश कसा केला जाऊ शकतो याची योजना भारतीय संघ तयार करत आहे. वाचा- सिराजचा संघात समावेश करण्याचा निर्णय सोपा असणार नाही. ऑगस्ट २०१९ नंतर प्रथमच मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा हे तिनही जलद गोलंदाज निवडीसाठी उपलब्ध असतील. या तिनही गोलंदाजांनी गेल्या काही वर्षात भारताकडून शानदार कामगिरी केली आहे. पण ऑस्ट्रेलियात पदार्पण केल्यापासून सिराजच्या कामगिरीत खुप सुधारणा झाली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १३ विकेट घेतल्या होत्या. भारताचा तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. वाचा- इशांत शर्माला विश्रांती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन इशांत शर्माला विश्रांती देऊ शकते. इशांतच्या जागी मोहम्मद सिराजला अंतिम ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. इशांतला संघाबाहेर ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे रविंद्र जडेजाचे फिट होणे आहे. जडेजा गेल्या दोन वर्षापासून शानदार फलंदाजी करत आहे. त्याला ऑलराउंडर म्हणून अंतिम ११ मध्ये स्थान मिळेल. या शिवाय आर अश्विनने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत गोलंदाजी सोबत फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे अंतिम संघात अश्विन आणि जडेजा हे दोन खेळाडू खेळतील. वाचा- सलामीवीरांमध्ये रोहित शर्माला अंतिम सामन्यात स्थान मिळेल. तर मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल यापैकी एकाला बाहेर बसावे लागले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मयांकची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती त्यामुळे गिलचा समावेश होण्याची शक्यता अधिक आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xaYMGi
No comments:
Post a Comment