
नवी दिल्ली : आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय आता बीसीसीआयने घेतला आहे. पण आता युएईच्या सरकारने एक नवीन नियम बनवला आहे. त्यामुळे आयपीएलला मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. युएईच्या सरकारने कोणता नियम बनवला, पाहा...युएईच्या सरकारने आता एक नवीन नियम बनवला आहे. त्यांनी आता रेड लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार या लिस्टमध्ये काही देशांचा समावेश करण्यात आला आहे. या लिस्टमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आबुधाबीच्या आरोग्य मंत्रालयाने आता भारतीयांच्या प्रवेशावर आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे आता आयपीएल युएईमध्ये कसे खेळवायचे, हा मोठा प्रश्न बीसीसीआयपुढे असेल. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या... करोना व्हायरसमुळे फक्त आयपीएल युएईमध्ये खेळवली जात नाहीए, तर पाकिस्तान सुपर लीगही युएईमध्येच खेळवली जात आहे. या लीगमध्ये काही भारतीयांचाही समावेश आहे. पण युएईच्या सरकारने आता भारतीयांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे आता या लीगचे अस्तिस्व धोक्यात आले आहे. कारण या लीगचे ब्रॉडकास्टर्स काही भारतीय आहेत. त्यामुळे युएईच्या सरकारच्या या नियमाचा फटका या लीगला बसू शकतो. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने खास परवानगी घेऊन भारताच्या ब्रॉडकास्टर्सना व्हिसा मिळवून दिला होता. पण आता ही मालिका कव्हर करणाऱ्या भारतीयांच्या प्रवेशावर युएईच्या सरकारने आता आक्षेप घेतला आहे. सध्याच्या घडीला भारतीय व्यक्ती या दुबईमध्ये क्वारंटाइन आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय युएईचे सरकार बुधवारी घेणार आहे. जर भारतीयांना परवानगी देण्यात आली तर ही लीग सात जूनपासून सुरु होऊ शकते, पण जर असे होऊ शकले नाही तर त्याचा मोठा फटका पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला बसू शकतो. कारण ही लीग जर वेळेत सुरु झाली नाही तर त्यानंतर होणाऱ्या दौऱ्यांवर त्याचा गंभीर परीणाम होऊ शकतो. त्यामुळे आता युएईचे सरकार या घडीला नेमका काय निर्णय घेते आहे, यावर सर्व अवलंबून असणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wLwvpi
No comments:
Post a Comment