लॉर्ड्स: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला काल बुधवारपासून सुरूवात झाली. पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर न्यूझीलंडने समाधनकारक धावसंख्या उभी केली. वाचा- न्यूझीलंडचा सलामीवीर याने पहिला दिवस गाजवला. त्याने क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर पदार्पणात शतक करण्याचा पराक्रम केला. या शतकी खेळीत त्याने एका विक्रमाची देखील नोंद केली. लॉर्ड्स मैदानावर पदार्णात शतक करणारा तो सहावा खेळाडू ठरला त्याच बरोबर त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा २५ वर्ष जुना विक्रम मोडला. वाचा- पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कॉन्वे नाबाद १३६ धावांवर खेळत होता. तर न्यूझीलंडने ३ बाद २४६ धावा केल्या. गांगुलीने १९९६ साली पहिल्या कसोटी सामन्यात १३१ धावा केल्या होत्या. त्याचे पदार्पण देखील लॉर्ड्सवर झाले होते. योगायोग म्हणजे या दोन्ही फलंदाजांचा वाढदिवस ८ जुलै रोजी असतो आणि दोघेही डाव्या हाताने फलंदाजी करतात. वाचा- लॉर्ड्स मैदानावर पदार्पणात शतक करणारा कॉन्वे तिसरा परदेशी खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या हॅरी ग्राहम यांनी १८९३ साली १०७ धावा केल्या होत्या. वाचा- न्यूझीलंडने पहिल्या दिवशी ३ बाद २४६ धावा केल्या असून कॉन्वे १३६ तर हेन्नी निकोल्स ४६ धावांवर खेळत आहेत. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत १३२ धावा जोडल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SU3adW
No comments:
Post a Comment