
मुंबई: क्रिकेटमधील सर्वात जुना प्रकार म्हणजे कसोटी होय. गेल्या काही दिवसात कसोटी क्रिकेटमधील रोमांच वाढत चालला आहे. सध्या वनडे आणि टी-२० क्रिकेटची लोकप्रियता जास्त असली तरी हे अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ आज इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात प्रथम न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. वाचा- कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आणि योगा योग देखील होतात. अशाच एका अजब योगाबद्दल आज जाणून घेऊयात. कसोटीत एका संघातील सर्व म्हणजे ११ खेळाडूंनी गोलंदाजी केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त चार वेळा असे घडले आहे की ज्यामध्ये संघातील सर्व खेळाडूंनी गोलंदाजी केली. यात भारतीय संघाचा समावेश आहे. वाचा- भारतीय संघ २००२ साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. तेव्हा सेंट जोन्स येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी दिली होती. या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करत ९ बाद ५१३ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात १९६ षटके गोलंदाजी केली. कर्णधार सौरव गांगुलीने मुख्य गोलंदाजांशिवाय सचिन तेंडुलकर, वासीम जाफर, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, शिव सुंदर दास आणि विकेटकीपर अजय रात्रा यांनाकडून गोलंदाजी करवून घेतली होती. स्वत: कर्णधार गांगुलीने देखील गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजने ९ बाद ६२९ धावा केल्या आणि ही कसोटी ड्रॉ झाली. वाचा- वाचा- भारतीय संघाच्या आधी १८८४ साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी गोलंदाजी केली होती. पण ही कसोटी देखील ड्रॉ झाली होती. त्यानंतर १९८० साली ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटीत पुन्हा ११ खेळाडूंनी गोलंदाजी केली. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघातील गोलंदाजांनी ही कामगिरी केली. तर २००५ साली वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सर्व खेळाडूंनी गोलंदाजी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fJ279G
No comments:
Post a Comment