नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माबाबत आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने मोठी भविष्यवाणी केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा कोणता पराक्रम करू शकतो, हे त्यांनी एका खास मुलाखतीमध्ये सांगितले आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रमीझ राजा यांनी सांगितले की, " भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये काही दिवसांमध्येच विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या महत्वाच्या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामीला जातील. माझ्यामते जर रोहित शर्मा चांगल्या लयीत असला तर तो एक मोठा पराक्रम या सामन्यात करू शकतो. माझ्यामते रोहित चांगल्या लयीत दिसला तर तो या सामन्यात द्विशतकही झळकावू शकतो. कारण रोहित शर्मा एकदा स्थिरस्थावर झाला तर त्याला बाद करणे हो कोणासाठीगी सोपे नसते." राजा यांनी पुढे सांगितले की, " रोहितला फलंदाजी करताना जास्त विचार करण्याची गरज नाही. रोहितने फक्त आपला नैसर्गीक खेळ केला तरीही त्याच्याकडून चांगल्या धावा होऊ शकतात. त्यामुळे रोहित शर्माने आपला आक्रमकपण सोडायला नको. त्याने आक्रमक क्रिकेट खेळायला हवे. कारण तो एक आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळेच त्याने तसाच खेळ करायला हवा." रोहितकडे सुरुवातीला ७-८ महिने बॅटच नव्हती...रोहितकडे २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये स्वत:ची बॅट नव्हती. ज्या स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवले होते त्या स्पर्धेत रोहितने दुसऱ्याची बॅट घेऊन फलंदाजी केली होती. भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकच्या एका मुलाखतीत रोहितने या गोष्टीचा खुलासा केला. २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहितने दिनेश कार्तिकची बॅट वापरली होती. त्या बॅटबद्दल बोलताना रोहित म्हणाला, असे नाही की मला ती बॅट खुप आवडली होती. सराव करताना मी ती बॅट दोन-तीन वेळा पाहिली होती. वर्ल्डकपवेळी माझ्याकडे स्वत:ची बॅटच नव्हती, सुपर बॅट होती ती मी जर चुकत नसले तर दिनेशची ती बॅट मी सात ते आठ महिने वापरली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wLzG0c
No comments:
Post a Comment