नवी दिल्ली: मी प्रशिक्षक असताना भारताच्या अ संघात निवड करण्यात आलेल्या प्रत्येक खेळाडूला दौऱ्यात किमान एक तरी सामना खेळण्याची संधी द्यायचो, असे भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार याने सांगितले. सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख असलेल्या द्रविडने १९ वर्षाखालील आणि त्यानंतर भारत अ संघातील खेळाडूंना घडवण्याचे काम केले. वाचा- पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. राहुल सध्या भारत अ किंवा १९ वर्षाखालील संघासोबत प्रवास करत नसला तरी या संघात निवड झालेल्या खेळाडूंना सामना खेळण्याची संधी मिळेल असा त्याचा प्रयत्न असतो. वाचा- मी खेळाडूंना नेहमी सांगायचो, जर तुम्ही माझ्या सोबत अ संघाच्या दौऱ्यावर आला तर किमान एक तरी सामना खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. संघात निवड झाली आणि एकही सामना खेळण्यास मिळाले नाही, असे कधीच होणार नाही. मी जेव्हा लहान होतो तेव्हा भारत अ संघासोबत दौऱ्यावर गेल्यावर एकही सामना न खेळण्यास मिळाल्याचा अनुभव घेतला होता, असे राहुल द्रविडने एका मुलाखतीत सांगितले. जेव्हा तुम्हाला दौऱ्यावर जाऊन एकही मॅच खेळायला मिळत नाही तेव्हा खुप वाइट वाटते, असे तो म्हणाला. वाचा- जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा ७००-८०० धावा करता. तुम्ही संघासोबत जात आणि संधी मिळत नाही. त्यानंतर निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी पुढील हंगामात पुन्हा ८०० धावा करता, असे द्रविड म्हणाला. ही गोष्ट करणे सोपे नसते. कारण याची कोणतीही हमी नसते की तुम्हाला पुन्हा संधी मिळले. त्यामुळेच तुम्हाला सुरुवाताला खेळाडूंना सांगावे लागते की हे सर्वोत्तम १५ खेळाडू आहेत आणि आपल्याला यांच्या सोबत खेळायचे आहे. भलेही तो सर्वोत्तम संघ नसला तरी १९ वर्षा खालील स्तरावरील सामन्यात आपण पाच ते सहा बदल करू शकतो. वाचा- सध्या भारतीय क्रिकेटपटूंना जगातील सर्वात फिट खेळाडू मानले जाते. पण एक काळ असा होता की जेव्हा फिटनेस संदर्भात आवश्यक माहिती नव्हती. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी ईर्षा केली जात असे, असे देखील त्याने सांगितले. राहुल द्रविडकडे NCAचा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे आणि पुढील पिढी घडवण्याचे काम करण्यात तो महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3veHSVF
No comments:
Post a Comment