नवी दिल्ली: भारत आणि श्रीलंका यांच्यात जुलै महिन्यात प्रत्येकी ३ सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका होणार आहे. भारताच्या या दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे तर जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा उपकर्णधार असेल. वाचा- गेल्या ११ वर्षापासून भारतीय संघाकडून खेळत आहे आणि प्रथमच त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. बीसीसीआयने दिलेल्या या नव्या जबाबदारीवर शिखरने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. देशाचे नेतृत्व करण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळत आहे यासाठी मी आभार व्यक्त करतो. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद! असे ट्विट शिखरने केले आहे. वाचा- शिखरने आतापर्यंत ३४ कसोटी, १४२ वनडे आणि ६५ टी-२० सामने खेळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो शानदार फॉर्ममध्ये दिसतोय. आयपीएल २०२१ मध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. वाचा- भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेने दौऱ्याची सुरुवात होणार आहे. १३ जुलै रोजी पहिली वनडे असेल. त्यानतंर २१ जुलै रोजी टी-२० लढतींना सुरुवात होईल. या दौऱ्यासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, चेतन साकरिया, के गौतम या आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. शिखरच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारत श्रीलंकेत खेळत असेल तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे दोन संघ खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. वाचा- श्रीलंका दौऱ्यासाठीचा भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xhVMro
No comments:
Post a Comment