नवी दिल्ली: जगभरातील अनेक क्रिकेट बोर्ड खेळाडूंसोबत वार्षिक करार करत असतात. या करारानुसार त्यांना एक विशिष्ठ रक्कम मिळत असते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात पुरुष संघावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असते. काही खेळाडूंना वर्षासाठी ७ कोटी इतकी रक्कम दिली जाते. या शिवाय मॅच फी आणि अन्य बोनस देखील खेळाडूंना मिळत असतो. वाचा- फलंदाजाने झळकावल्यास किंवा द्विशतक केल्यास अथवा गोलंदाजाने पाच विकेट घेतल्यास बीसीसीआयकडून अतिरिक्त पैसे दिले जातात. भारतीय क्रिकेट बोर्डाने बोनस देण्याची सुरुवात बऱ्याच काळापासून सुरू केली आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखादा खेळाडू शतक करतो तेव्हा त्याला बोनस म्हणून पाच लाख रुपये दिले जातात. तर द्विशतक केल्यास सात लाख रुपयांचा बोनस मिळतो. गोलंदाजाने एका डावात पाच विकेट घेतल्यास त्याला पाच लाख रुपये दिले जातात. वाचा- बीसीसीआयकडून वार्षिक करार करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये जे ए प्लस गटात येतात त्यांना वर्षाला सात कोटी रुपये दिले जातात. ए गटातील खेळाडूंना वर्षाला ५ कोटी, बी गटातील खेळाडूंना ३ कोटी दिले जातात. सर्वात अखेरच्या सी गटातील खेळाडूंना वर्षाला एक कोटी दिले जातात. वाचा- भारतीय खेळाडू जेव्हा कसोटी सामन्यात खेळतात तेव्हा त्यांना १५ लाख रुपये मॅच फी म्हणून दिले जातात. तर एका वनडे सामन्यासाठी ६ लाख रुपये मिळतात. टी-२० सामन्यासाठी प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये दिले जातात. या शिवाय दैनंदिन भत्ता वेगळा असतो. वाचा- इतक नव्हे तर भारतीय संघ एखादी मोठी स्पर्धा (जसे की आयसीसी वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप, आशिया कप, मोठी कसोटी मालिका अथवा चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकतो तेव्हा बोनस रक्कम आणखी वाढते. २००७ साली टी-२० वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते. तेव्हा बीसीसीआयने त्याला १ कोटी रुपयांचा बोनस दिला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cu3XZV
No comments:
Post a Comment