लंडन: आठ वर्षापूर्वी वर्णद्वेषी आणि लिंगभेदी ट्विट केल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने ओली रॉबिन्सन याच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर बोर्डाने अन्य खेळाडूंच्या जुन्या ट्विटची चौकशी सुरू केली आहे. यात इंग्लंड संघातील मोठे काही खेळाडू अडकण्याची शक्यता आहे. वाचा- न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिन्सनला अश्वील आणि लिंगभेदी ट्विट केल्यामुळे निलंबीत करण्यात आले होते. आता यासंदर्भात अन्य काही खेळाडू देखील अडचणी येण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार ,अनुभवी गोलंदाज आणि विकेटकीपर फलंदाज यांची देखील चौकशी होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने खेळाडूंकडून सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या अश्लील पोस्ट आणि प्रतिक्रियांवर गंभीरपणे कारवाई करण्याचे ठरवलेले दिसते. वाचा- मॉर्गन, एडरसन आणि बटलर यांनी भारतीय लोकांची चेष्टा करणारे ट्विट केले होते. या प्रकरणी ईसीबीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी योग्य कारवाई केली जाईल आणि प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र विचार केला जाणार असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. बटलर आणि मॉर्गन यांनी संबंधित पोस्टमध्ये भारतीय लोकांची चेष्टा करण्यासाठी सर या शब्दाचा वापर केला होता. वाचा- ओली रॉबिनसन याने २०१२-१३ मध्ये काही आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यानंतर एडरसन, बटलर आणि मॉर्गन यांच्या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. टेलीग्राफ.युकेने दिलेल्या वृत्तानुसार बटलरने केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले आहे. यात मॉर्गनने बटलरला टॅग करताना सर तु माझा आवडता फलंदाज आहेत असे म्हटले होते. एडरसनने २०१० साली समलैंगिकतेशी संबंधित एक ट्विट केले होते. यासंदर्भात बोलताना तो म्हणाला, ती गोष्ट १० -११ वर्षापूर्वीची आहे. निश्चितपणे एक व्यक्ती म्हणून माझ्यात बदल झाला आहे. एडरसनने स्टुअर्ट ब्रॉड संदर्भात एक ट्विट केले होते. त्या पोस्टमध्ये त्याने स्टुअर्टचा उल्लेख १५ वर्षाचा लेस्बियन असा केला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pzrKgt
No comments:
Post a Comment