मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने आणखी एक घर विकत घेतले आहे. धोनीचे हे नवे घर महाराष्ट्रात आहे. वाचा- धोनीने त्याचे नवे घर पुण्यातील येथे घेतले आहे. गेल्या वर्षी धोनीने मुंबईत एक घर खरेदी केले होते. त्या घराचा फोटो धोनीची पत्नी साक्षीने शेअर केला होता. आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित झाल्यानंतर सध्या धोनी रांची येथील फार्म हाऊसवर कुटुंबासोबत आहे. धोनीचे पुण्यातील नवे घर रावत येथील एस्टाडो प्रेसिडिंशियल सोसायटीमध्ये आहे. वाचा- आता आयपीएलमधील उर्वरित लढतीत धोनी पुन्हा मैदानावर दिसेल. या लढती युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. मैदान आणि मैदानाच्या बाहेर कशी गुंतवणूक करायची हे धोनीला चांगलेच माहिती आहे. रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल सारखे खेळाडू धोनीमुळे तयार झाले. वाचा- मैदानाबाहेर म्हणायचे झाले तर धोनीने मनोरंजन क्षेत्रात पाउल ठेवले आहे. त्याची स्वत:ची कंपनी असून एमएसडी एंटरटेनमेंट असे त्याचे नाव आहे. या शिवाय धोनीचे रांचीमध्ये फार्म हाऊस देखील आहे. त्याचे नाव कैलाशपती असे आहे. हे फार्म हाऊस तयार करण्यास ३ वर्षाचा कालावधी लागला. यात इंडोर स्टेडियम, स्विमींग पूर आणि जिम आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fHw3D3
No comments:
Post a Comment