नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरी आता एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. धोनीची मुगली झिवाने आपल्या सोशल मीडियावर या नवीन पाहुण्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या फोटोला काही वेळातच दीड लाख लाइक्स मिळाले आहेत. झिवाने आपल्या इंटाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झिवा एका अश्वाबरोबर दिसत आहे. झिवा या अश्वाच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवत आहे. झिवाने आपल्या इंस्टाग्रामवर हाच फोटो शेअर केला आहे. हा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला असून त्याला दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी लाइक्स दिले आहे. पण झिवाने हा फोटो शेअर करताना फक्त एक इमोजी वापरला आहे, या नवीन पाहुण्याचे नाव मात्र तिने सांगितलेले नाही. यापूर्वीही धोनीने एक अश्व आपल्या घरी आणला होता. त्या अश्वाचे नाव चेतक होते. धोनीची पत्नी साक्षीने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आमच्या घरात एक नवीन सदस्य आला असून आम्ही त्याचे स्वागत करत आहोत, असे साक्षीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. काही दिवसांपूर्वी साक्षीने पुन्हा एकदा या अश्वाला मसाज करत असतानाचा फोटो शेअर केला होता. गेल्या वर्षी धोनीने मुंबईत एक घर खरेदी केले होते. त्या घराचा फोटो धोनीची पत्नी साक्षीने शेअर केला होता. त्यानंतर धोनीने आता पिंपरी-चिंचवड येथे नवीन घर घेतले आहे. धोनीचे पुण्यातील नवे घर रावत येथील एस्टाडो प्रेसिडिंशियल सोसायटीमध्ये आहे. आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित झाल्यानंतर सध्या धोनी रांची येथील फार्म हाऊसवर कुटुंबासोबत आहे. पण आता आयपीएलचे उर्वरीत सामने सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्यामुळे काही महिन्यांमध्ये धोनी आता पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. धोनीचे चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतील, यात शंकाच नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uMtTGr
No comments:
Post a Comment