नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये काही दिवसांतच विश्व अजिंक्यपद स्पर्धेची फायनल रंगणार आहे. ही फायनल जिंकण्यासाठी आता भारतीय संघाला एक रहस्यमय मेसेज मिळाला आहे. या मेसेजचे उत्तर शोधल्यावर भारतीय संघ ही फायनल जिंकू शकतो, असे भारताच्या माजी क्रिकेटपटूने म्हटले आहे. हे रहस्यमय कोडं नेमके काय आहे, पाहा...भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफर हा सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. यापूर्वीही जाफरने भारतीय संघाला काही रहस्यमय संदेश दिले आहेत आणि त्याचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. यावेळी फायनलच्या पूर्वीही जाफरने असाच एक मेसेज भारताच्या फलंदाजांसाठी दिला आहे. या मेसेजमध्ये त्याने सांगितले आहे की, " जर भारतीय फलंदाजांना चांगल्या धावा करायच्या असतील तर त्यांनी जुन्या बॉलीवूड सिनेमांमध्ये पोलिस करायचे ते करायला हवे." या कोडचे उत्तर शोधणे तसे सोपे नाही. त्यामुळे भारतीय संघ हे रहस्यमय कोडं सोडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जाफर यापूर्वी इंग्लंडच्या दौऱ्यावर दोनवेळा गेला आहे. त्यामुळे जाफरने यावेळी भारतीय फलंदाजांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, " जुन्या हिंदी सिनेमामध्ये पोलिस हे उशिरा पोहाचायचे. त्यामुळे इंग्लंडमध्ये खेळताना चेंडूवर जाण्याची घाई करू नका. चेंडूवर तुम्ही जेवढ्या उशिरा जाऊन फटकेबाजी कराल, तेवढाच तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे भारतीय फलंदाज आता जाफरने सांगितलेला संदेश ऐकतात का आणि तशी फलंदाजी करतात का, याची उत्सुकता सर्वांना असेल." अजिंक्य रहाणेनेही सांगितली जिंकण्याची रणनिती...रहाणेने एका खास मुलाखतीमध्ये सांगितले की, " इंग्लंडमध्ये फलंदाजी करण्यासाठी आव्हान असणार आहे, असे म्हटले जात आहे. पण आव्हानाचा सामना करायला भारतीय संघाला नेहमीच आवडते. हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. इंग्लंडमध्ये फलंदाजी करण्याचे एक तंत्र आहे. इंग्लंडमध्ये सरळ बॅटने फलंदाजी केली तर जास्त धावा होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही खेळपट्टीवर स्थिरस्थावर झालात तर तुमच्याकडून जास्त धावाही होऊ शकतात. त्यामुळे फलंदाजी करताना सरळ फटके मारणे आणि जास्त काळ खेळपट्टीवर स्थिरावणे, या दोन गोष्टी केल्या तर भारतीय संघ चांगली धावसंख्या उभारू शकतो. फायनलच्यापूर्वी सराव करण्यासाठी आम्हाला बराच कालावधी मिळाला आहे आणि हीच गोष्ट आमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gAsTjy
No comments:
Post a Comment