साऊदम्पटन : पावसामुळे आजचा संपूर्ण दिवसाचा खेळ वाया गेला. कसोटी सामन्यात प्रत्येक दिवशी ९० षटकांचा खेळ होत असतो. पण उद्याच्या दिवशी मात्र फायनलमध्ये ९० षटकांचा खेळ होणार नसल्याची माहिती आता पुढे आली आहे. आजच्या पहिल्या दिवशी पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही. त्यामुळे आज एकही चेंडूचा खेळ झाला नाही. त्यामुळे ही वाया गेलेली षटके आता दुसऱ्या दिवशी खेळवली जाऊ शकतात, जेणेकरून वाया गेलेल्या षटकांची भरपाई होऊ शकते. त्यामुळे उद्या ९० पेक्षा जास्त षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळू शकतो. उद्या किती षटके होणार, याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. त्यानुसार उद्याच्या दिवशी ९८ षटकांचा खेळ होऊ शकतो. पहिल्या दिवशी वाया गेलेली आठ षटके यावेळी टाकली जाऊ शकतात. त्याचबरोबर आता प्रत्येक दिवशी अतिरीक्त षटकांचा खेळ होऊ शकतो. कारण पहिल्या दिवशी वाया गेलेल्या षटकांची भरपाई आता .येत्या चार दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. जर चार दिवसांमध्ये वाया गेलेल्या षटकांची भरपाई होऊ शकली नाही, तर फायनलमध्ये राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता सामना राखीव दिवशी खेळवला जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता प्रत्येक दिवशी ९० पेक्षा जास्त षटकांचा खेळ होऊ शकतो, असे सध्याच्या घडीला तरी दिसत आहे. फक्त आता पाऊस पुन्हा किती वेळा सामन्यात खोडा घालतो, यावर पुढचे षटकांचे समीकरण ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wEfJsx
No comments:
Post a Comment