साऊदम्पटन : क्रिकेट विश्वाचे लक्ष आता फायनलच्या दुसऱ्या दिवसावर असणार आहे. फायनलचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी सामना लवकर सुरु करणार का, याची उत्सुकता सर्वच चाहत्यांना आहे. पहिल्या दिवसांच्या षटकांची भरपाई दुसऱ्या दिवशी केली जाणार आहे. त्याचबरोबर पहिल्या दिवसाचा जो वेळ वाया गेला, त्याची भरपाई दुसऱ्या दिवशी केली जाणार का, याची उत्सुकताही चाहत्यांना आहे. कारण फायनलचा प्रत्येक क्षण आपल्याला पाहता यावा, यासाठी चाहते प्रयत्नशील असतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सामना नेमका कधी सुरु होणार, हे नक्कीच चाहत्यांना माहिती करायला आवडेल. फायनलच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ इंग्लंडच्या वेळेनुसार सकाळी १०.३० ला सुरु होणार आहे, म्हणजेच भारतामध्ये हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. सामन्याच्या काही वेळापूर्वी नाणेफेक होईल. त्यावेळी दोन्ही कर्णधार आपल्या संघात कोणते खेळाडू आहेत, हे सांगतील आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात करण्यात येईल. चाहत्यांना आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाची उत्सुकता लागेलली आहे. दुसऱ्या दिवशी तरी संपूर्ण खेळ पाहायला मिळावा, अशी आशा चाहत्यांना असेल. त्यामुळे उद्याचे हवामान नेमकं कसं आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. दुसऱ्या दिवशी होणार वाया गेलेल्या षटकांची भरपाई.... आज एकही चेंडूचा खेळ झाला नाही. त्यामुळे ही वाया गेलेली षटके आता दुसऱ्या दिवशी खेळवली जाऊ शकतात, जेणेकरून वाया गेलेल्या षटकांची भरपाई होऊ शकते. त्यामुळे उद्या ९० पेक्षा जास्त षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळू शकतो. उद्या किती षटके होणार, याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. त्यानुसार उद्याच्या दिवशी ९८ षटकांचा खेळ होऊ शकतो. पहिल्या दिवशी वाया गेलेली आठ षटके यावेळी टाकली जाऊ शकतात. त्याचबरोबर आता प्रत्येक दिवशी अतिरीक्त षटकांचा खेळ होऊ शकतो. कारण पहिल्या दिवशी वाया गेलेल्या षटकांची भरपाई आता .येत्या चार दिवसांमध्ये करण्यात येणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wztNUl
No comments:
Post a Comment