लंडन : भारतीय महिला संघाची युवा सलामीवीर शेफाली वर्माने इंग्लंडमध्ये खेळताना इतिहास रचला आहे. कारण शेफालीने जी कामगिरी केली आहे ती आतापर्यंत एकाही महिला क्रिकेटपटूला कधीही करता आली नव्हती. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील महिला संघांमध्ये कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात सलामीवीर शेफालीने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये तिने अर्धशतकपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. शेफालीने पहिल्या डावात ९६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात चहापानापर्यंत शेफालीने ५५ धावा केल्या होत्या. आतापर्यंत एकाही महिला क्रिकेटपटूला पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत अर्धशतकापेक्षा जास्त धावा करता आल्या नव्हत्या. शेफालीचे शतक पहिल्या डावात फक्त चार धावांनी हुकले होते. पण शेफालीला दुसऱ्या डावात शतक करण्याची नामी संधी आहे, असे केल्यास सर्वात कमी वयात शतक झळकावणारी महिला क्रिकेटपटू शेफाली ठरू शकते. भारताच्या पुरुष संघातील सामन्याने आज सर्वांनाच निराश केले. कारण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व अजिंक्यपद कसोटीची फायनल आजपासून सुरु झाली खरी, पण पावसामुळे टॉही होऊ शकला नाही. पण दुसरीकडे शेफालीने इतिहास घडवत भारतीय चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xzKAXg
No comments:
Post a Comment